Asia Cup 2023 : आशिया कपचा संघ जाहीर करण्याची तारीख ठरली; चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला, अय्यर की दुसरा कोणी?

Asia Cup 2023 Team India Squad
Asia Cup 2023 Team India Squad esakal
Updated on

Asia Cup 2023 Team India : आशिया कप 2023 येत्या 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंका येथे खेळवला जाणार आहे. आशिया कप अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही भारतीय संघाची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. अखेर बीसीसीआयला संघ जाहीर करण्याचा मुहूर्त मिळाला आहे.

बीसीसीआय 20 ऑगस्टला भारताचा आशिया कपसाठीचा संघ जाहीर करेल. हा संघ जवळपास मायदेशात वर्ल्डकपमध्ये खेळणारा संघ असणार आहे. या संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची थोडीफार कल्पना येईल. (Asia Cup 2023 Team India Squad Announcement News)

श्रेयस अय्यर फिट झाला आहे की नाही हे देखील संघ घोषित झाल्यानंतर समोर येईल. तो पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएमध्ये घाम गाळतोय.

Asia Cup 2023 Team India Squad
Pakistan Cricket : अक्रमने कान उपटले... स्वातंत्र्य दिनाच्या व्हिडिओत मोठी चूक करणाऱ्या PCB ला सुचले उशिरा शहाणपण

श्रेयस अय्यर हा आशिया कप खेळण्याची शक्यता धुसर आहे. भारतासाठी हा मोठा धक्का असेल. कारण वनडे क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा मोठा प्रश्न संघासमोर असणार आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकासाठी आजमावून पाहिले होते.

मात्र टी 20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा सूर्याला वनडेत सूरच गवसला नाही. दुसऱ्या बाजूला संजू सॅमसन देखील आपल्या कामगिरीत सातत्य राखू शकला नाही. (Shreyas Iyer)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'केएल राहुल हा जवळपास फिट झाला असून तो विकेटकिपिंग देखील करत आहे. मात्र श्रेयस अय्यर हा अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत दोघेही सराव करत आहेत.

लवकरच ते सराव सामना देखील खेळणार आहेत. संघ आणि एनसीएचे फिजिओ खेळाडूंच्या फिटनेसचा स्तर तपासणार आहेत. त्यामुळे संघ जाहीर करण्यास उशीर होत आहे.'

Asia Cup 2023 Team India Squad
Bajrang Punia : महिला कुस्तीपटूंना धोका... हा व्यक्ती जिंकला तर बृजभूषण जिंकला; बजरंग सराव सोडून भारतात परतला

जर अय्यर फिट झाला नाही तर चौथ्या क्रमांकावर कोण?

  • - रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा सल्ला दिला आहे. विराट कोहलीने 55.21 च्या सरासरीने 1767 धावा केल्या आहेत.

  • - जर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला तर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळे संघाच्या फलंदाजीत एक स्थिरता येईल.

  • - जर हे इक्वेशन बसवायचं असेल तर भारताला शुभमन गिल आणि इशान किशन यांना सलामीला पाठवायला हवं. जर केएल राहुल पूर्णपणे फिट असेल तर इशान किशनला संघात स्थान मिळणार नाही.

  • - अशा परिस्थितीत भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव हा एकमेव पर्याय उपलब्ध राहतो. संजू सॅमसन देखील दावेदारी सादर करू शकतो. मात्र वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी 20 मालिकेत सुमार कामगिरी केल्याने ही संधी त्याने दवडली आहे.

  • - तिलक वर्माने देखील आपली गुणवत्ता आणि सातत्याने धावा करण्याची क्षमता विंडीज दौऱ्यावर सिद्ध करून दाखली आहे. त्याने वेस्ट इंडीज विरूद्धच्या 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 57 च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत.

  • - मात्र भारतीय संघ ज्या खेळाडूला वनडे क्रिकेटचा अनुभव नाही अशा तिलकला संधी देणार का हा मोठा प्रश्न उपस्थित होतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.