Asia Cup 2023: इशान किशनसाठी कोण देणार बलिदान? रोहित धर्म संकटात, गिल अन् कोहलीच्या जागी टांगती तलवार

Asia Cup
Asia Cup
Updated on

Asia Cup 2023 Ind vs Pak : आशिया कप 2023 सुरु झाला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यासोबत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. टीम इंडियाला 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

दरम्यान, दुखापतीतून सावरल्यानंतर केएल राहुलची आशिया कप संघात निवड झाली. मात्र, संघ श्रीलंकेला रवाना होण्याच्या काही तास आधी राहुल पहिल्या दोन सामन्यात खेळणार नसल्याची कोच द्रविडनी माहिती दिली. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा अडचणीत सापडला आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये केएल राहुल खेळणार नाही त्यामुळे इशान किशन यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट आहे, पण यामुळे प्लेइंग इलेव्हनचे गणित बिघडू शकते.

Asia Cup
Ind vs Pak : 'जास्त भावूक होऊ शकत नाही कारण...' पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी उपकर्णधार काय म्हणाला?

रोहित शर्मासाठी धर्म संकट म्हणजे, इशान किशनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणे आता निश्चित आहे. इशान किशन चांगला खेळत नाही असे पण नाही, कारण वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने दमदार फलंदाजी केली होती. मात्र, इशान किशन कुठे फलंदाजी करणार हा प्रश्न आहे.

राहुल पाचव्या क्रमांकावर आणि सलामी या दोन्ही ठिकाणी चांगला खेळतो, पण इशान किशन मधल्या फळीत जास्त फलंदाजी केली नाही. जर तो सलामीला आहे तर ते टीम इंडियासाठी चांगले सिद्ध होईल.

Asia Cup
Sachin Tendulkar : 'ती' जाहिरात केली असती तर घरी जाऊ शकलो नसतो; सचिनने सांगितला शारजातील इनिंगनंतरचा किस्सा

अशा परिस्थितीत आता इशान किशनसाठी कोण बलिदान देणार हा मुद्दा समोर येतो. त्यात केवळ दोन खेळाडूंची नावे आहेत. शुभमन गिल आणि विराट कोहली. शुभमन आणि विराटच्या फलंदाजी क्रमवारीत बदल झाला, तर भारतीय संघासमोर मधल्या फळीत पुन्हा संकट उभे राहणार आहे. कारण श्रेयस अय्यरही आशिया कप स्पर्धेत दुखापतीनंतर थेट पुनरागमन करत आहे.

केएल राहुल खेळत नसल्यामुळे आता रोहितसोबत कोण सलामी देणार हा प्रश्न आहे. इशान किशनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर सलामी देताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. शुभमन गिलने रोहितसोबत वनडेमध्ये काही काळ डावाची सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत इशान किशनला सलामी दिली तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.

शुभमन गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास विराट कोहलीला बलिदान द्यावे लागेल आणि तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, मात्र विराटच्या फलंदाजीच्या क्रमाशी छेडछाड केल्याने टीम इंडिया अडचणीत येऊ शकते, अशी भीती आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा कोणत्या बॅटिंग कॉम्बिनेशन घेऊन मैदानात उतरतो, हे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.