Asia Cup 2023 : सामना पाकिस्तानात, उत्साह श्रीलंकेत! आजपासून रंगणार आशिया कपचा थरार

Asia Cup 2023 will begin today in Pakistan
Asia Cup 2023 will begin today in Pakistan
Updated on

Asia Cup 2023 : यंदाच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे अधिकृत यजमानपद पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे असल्याने उद्घाटनाचा सामना आज पाकिस्तानात होत आहे. बराच ऊहापोह झाल्यावर अखेर यजमान नात्याने मोजके काही सामने पाकिस्तानात भरवले जाऊन बाकीचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

पाकिस्तानचा सामना नेपाळ विरुद्ध असल्याने फारशी काही हलचल स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तानात नाही. उलटपक्षी श्रीलंकेत चांगलाच उत्साह जाणवतो आहे. ३१ ऑगस्टला श्रीलंकेचा सामना बांगलादेशसमोर असल्याने बरेच काही बोलले जात आहे, पण सत्य हेच आहे, की खरी प्रतीक्षा सगळ्यांना २ सप्टेंबरच्या भारत वि. पाकिस्तान मुकाबल्याची आहे.

Asia Cup 2023 will begin today in Pakistan
WFI Election : बुडत्याचा पाय खोलात... भारतीय कुस्ती महासंघाला सर्वोच्च न्यायालयातही बसला धक्का

‘अत्यंत कठीण काळात भारताने केलेल्या मदतीची जाणीव आम्हा श्रीलंकन लोकांना कायम राहणार आहे... म्हणून स्वागत आहे तुमचे श्रीलंकेत’, कोलंबो आंतरराष्ट्रीय बंडारनायके विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी भारतीयांचे स्वागत करत आहेत.

इतर देशांतील नागरिकांना ६० अमेरिकन डॉलर्स भरून व्हिसा दिला जात असताना सार्क देशांमधील नागरिकांना २५ अमेरिकन डॉलर्स भरून व्हिसा अगदी पटकन दिला गेला. भारताचा पहिला सामना निसर्गसुंदर कँडी शहरापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पल्लीकेले क्रिकेट स्टेडियमवर होणार असल्याने कोलंबो विमानतळावरून थेट कँडीला जाता येते. श्रीलंका हिरवेगार असूनही भारताप्रमाणेच श्रीलंकेतही यंदाच्या मोसमात कमी पाऊस झाल्याच्या खुणा प्रवासात दिसत होत्या.

Asia Cup 2023 will begin today in Pakistan
Virat Kohli : 2011 चा वर्ल्डकप जिंकला मात्र त्याचं महत्व... विराट कोहलीनं केलं मोठं वक्तव्य

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा अगदी तोंडावर आल्याने या आशिया करंडक स्पर्धेचे महत्त्व खूप वाढले आहे. भारत-पाकिस्तानसोबत श्रीलंका आणि बांगलादेश संघांनाही मोठी स्वप्नं पडत आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघ मोठा पल्ला गाठू शकला नाही, तरी काही अनपेक्षित निकालांचे धक्के देण्याची क्षमता राखून आहे. जास्त करून सामने श्रीलंकेत होणार असल्याने फक्त नाणेफेकीच्या कौलावर सामन्याचे भवितव्य ठरणार नसल्याचे समाधान खेळाडूंना मिळणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे सराव शिबिर आज संपले. बंगळूरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत एक आठवडा सराव करून भारतीय संघाने तयारी केली आहे. सरावासोबत खेळाडूंच्या तंदुरुस्तीची तपासणीही केली गेली आहे. दुखापतीतून श्रेयस अय्यर संपूर्णपणे बरा झाला असल्याने सरावादरम्यान दिसल्याचे अकादमीतील प्रशिक्षक सांगत होते. श्रेयस आणि के एल राहुलने गेले काही महिने अकादमीत तळ ठोकून दुखापतीवर मात करायचा प्रयत्न केला. श्रेयस अय्यर संपूर्णपणे बरा झाला असताना मुख्य दुखापतीतून सावरलेल्या के एल राहुलला दुसरीच छोटी दुखापत सतावायला लागल्याने त्याचा थोडा धीर सुटू लागला असे समजले.

Asia Cup 2023 will begin today in Pakistan
Igor Stimac : मी इथं चाटूगिरी करण्यासाठी आलो नाही... भारतीय फुटबॉल संघाचे कोच एवढे का भडकले?

भारतीय संघ बुधवारी श्रीलंकेत

बुधवारी भारतीय संघ प्रवास करून श्रीलंकेला येऊन पोहोचणार आहे. गुरुवारी सामना असलेले श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ कँडीत तळ ठोकून आहेत संयोजकांनी अत्यंत जाणीवपूर्वक स्पर्धेची आखणी अशी केली आहे, की भारत वि. पाकिस्तान किमान दोन सामने व्हावेत. त्यातून दोन कट्टर प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात येऊन धडकले तर तिसरा सामनाही होण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. अर्थातच बांगलादेश आणि श्रीलंकन संघ धक्कादायक कामगिरी करून अंतिम सामन्यात पोहोचण्याची स्वप्नं उराशी बाळगून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.