Asia Boxing Championship : गतविजेत्या अमित पंघालनं उपांत्या सामन्यात कझाकस्तानच्या बॉक्सरचा पराभव करत Asia Boxing Championship अंतिम फेरीत धडक मारली आहे. 52 किलो वजनी गटात भारताच्या अमित पंघाल यानं शुक्रवारी कझाकस्तानच्या साकन बिबोसिनोवला धूळ चारली. अमित पंघालने लागोपाठ दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अव्वल मानांकित अमित पंघालनं बिबोसिनोवचा 5-0 असा दारुण पराभव केला. (Asian Boxing Championships: Defending Champion Amit Panghal Reach Final)
अमित पंघालकडून पराभवचा धक्का बसल्यानंतर कझाकस्तानचा बिबोसिनोवला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. 2019 मध्ये झालेल्या विश्व चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये देखील पंघालनं साकेनला हरवत अंतिम फेरीत धडक मारली होती. आता पुन्हा अमित विजय पटकावणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण आजच्या विजयासह अमितने किमान रजतपदक निश्चित केलं आहे.
कझाकस्तानच्या तिसऱ्या मानांकित बिबोसिनोवने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. मात्र, अमित पंलाघन यानं संयम आणि चतुराईनं बिबोसिनोवला वरचढ होऊ दिलं नाही. त्याला अखेर 5-0 नं हरवत पंघालनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फायनलमध्ये त्याचा सामना मंगोलियाच्या ओरखोनटुंगालाग उनूबोल्ड सोबत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.