India vs Pakistan Live : भारताकडून पाकिस्तानचा सुपडा साफ; कर्णधार Harmanpreet Singh चा दरारा

Asian Champions Trophy 2024 Hockey IND vs PAK: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये भारत-पाकिस्तान या दोन अपराजित संघांमध्ये रोमहर्षक सामना पाहायला मिळाला.
IND vs PAK HOckey
IND vs PAK HOckeyesakal
Updated on

Asian Champions Trophy 2024 IND vs PAK Harmanpreet Singh :

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली. कर्णधार हरमनप्रीत सिंगचा दरारा याही सामन्यात पाहायला मिळाला आणि त्यासमोर पाकिस्तानचा संघ हरला. सुरुवातीच्या काही मिनिटांत आघाडी घेऊनही पाकिस्तानला तगड्या भारतीय संघाने पराभवाची चव चाखवली. पाकिस्तानने सामन्यात पुनरागमनासाठी जोर लावला, परंतु भारताचा गोलरक्षक कृष्णा पाठक याने अप्रतिम बचाव केला. पाकिस्तानचा या स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.