India vs Korea Hockey Live : चक दे इंडिया! भारताची फायनलमध्ये धडक; जेतेपदासाठी चीनला देणार टक्कर

Asian Champions Trophy 2024 : भारतीय पुरूष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ऐटीत प्रवेश केला. गतविजेत्या भारताला अंतिम सामन्यात चीनचा सामना करावा लागणार आहे.
IND vs Korea
IND vs Koreaesakal
Updated on

India in Final Asian Champions Trophy 2024 play against China: हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली. भारतीय संघाचे उपांत्य फेरीतही अपराजित मालिका कायम राखताना दक्षिण कोरियावर मात केली. अंतिम सामन्यांत त्यांना चीनचा सामना करावा लागणार आहे. यजमान चीनने प्रथमच फायनलमध्ये धडक देताना पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा धक्का दिला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने आजच्या सामन्यातही दोन गोल केले. उत्तम सिंग व जरमनप्रीत सिंग यांच्या प्रत्येकी १ गोलने भारताचा ४-१ असा विजय पक्का केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.