Jay Shah ACC President : मोठी घोषणा! BCCI चे सचिव जय शाह सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष

Jay Shah ACC President
Jay Shah ACC Presidentesakal
Updated on

Jay Shah ACC President : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चे सचिव जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच ACC चे अध्यक्षपदी निवड झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचा बॉस म्हणून ही त्यांची तिसरी टर्म असेल. याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. इंडोनेशियातील बाली येथे आशिया कप 2025 संदर्भात बैठक सुरू आहे.

Jay Shah ACC President
Shikhar Dhawan : धवन, होस्ट करिष्मा अन् लॉ ऑफ अट्रॅक्शन... शिखरच्या पॉडकास्टची जोरदार चर्चा

एएनआयनी या वृत्तसंस्थेने याला दुजोरा दिला आहे. आशिया कपचा पुढील हंगाम आता 2025 मध्ये होणार आहे. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. यापूर्वीची स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली गेली होती.

जय शाह यांचा दुसरा कार्यकाळ अजून संपलेला नाही आणि तिसऱ्यांदाही त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. पण नोव्हेंबरमध्ये आयसीसीच्या निवडणुका होणार आहे. तेव्हा जय शाह निवडणूक लढू शकतात, अशी शकता आहे.

एकप्रकारे त्यांना आशिया खंडाचा पाठिंबा मिळाला आहे. जय शाह सध्या बीसीसीआयचे सचिव आहेत, जे मोठे पद आहे. जर ते आयसीसीचे अध्यक्ष झाले तर हा भारताचा मोठा विजय असेल.

Jay Shah ACC President
Mumbai Cricket Team : धोनीचा पठ्ठ्या बनला मुंबईचा उपकर्णधार! दमदार कामगिरीनंतर मिळाली मोठी जबाबदारी

जय शाह यांनी 30 जानेवारी 2021 रोजी ACC चे अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यांच्या आधी पाकिस्तानचे नजमुल हसन आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होते. जय शाह ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयच्या सचिवपदी कार्यरत आहेत. त्यावेळी सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष बनले होते, आता रॉजर बिन्नी या पदावर आहेत. परंतु जय शाह यांचा सचिवपदाचा कार्यकाळ कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.