Asian Games 2023 : महिलांच्या अडथळा शर्यतीत फाऊलचा फिल्मी ड्रामा पण ज्योतीने रौप्य पटकावलंच...

त्यावर ज्योतीने आक्षेप घेतला. बरीच चर्चा झाल्यानंतर दोघींना धावू देण्याचा निर्णय झाला व शर्यत संपल्यावर पुन्हा फाऊल स्टार्ट तपासण्याचा निर्णय झाला.
Asian Games 2023
Asian Games 2023 esakal
Updated on

हौंग्‌ चौऊ - अॅथलेटिक्समधील महिलांच्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीत प्रचंड ड्रामा पाहायला मिळाला. या ड्राम्यानंतरही भारताच्या ज्योती यराजीने रौप्यपदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेत १०० मीटर हर्डल्स शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय होण्याचा मान मिळवला.

अंतिम शर्यतीत चीनच्या वू यानी हिने प्रथम फाऊल स्टार्ट केला. वू हिने स्टार्ट घेतल्याचे लक्षात येताच ज्योती आणि जपानची युमी तनाका यांनीही स्टार्ट घेतला. त्याच वेळी फाऊल झाल्याचे घोषित करत पंचांनी फायर केले. त्यामुळे शर्यत थांबवण्यात आली व वू यानी आणि ज्योती या दोघींना बाद ठरवण्यात आले.

त्यावर ज्योतीने आक्षेप घेतला. बरीच चर्चा झाल्यानंतर दोघींना धावू देण्याचा निर्णय झाला व शर्यत संपल्यावर पुन्हा फाऊल स्टार्ट तपासण्याचा निर्णय झाला. यामुळे ज्योतीच्या मानसिकतेवर परिणाम झाला. दुसऱ्यांदा शर्यत सुरू झाली. त्या वेळी ज्योतीने संथ प्रारंभ केला. अर्धे अंतर झाल्यावर तिने वेग वाढवला व चीनच्या वू यानी व लिन युवेईपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर शर्यत पूर्ण केली. अखेर पंचांनी फाऊल स्टार्ट तपासल्यावर फक्त वू यानीला बाद करून ज्योतीला रौप्यपदक बहाल करण्यात आले.

Asian Games 2023
Chh. Sambhaji nagar : ‘माउंट मनास्लू’वर रफिक शेख यांची यशस्वी चढाई

चीनचे पंच असलेल्या या निर्णयाविरुद्ध प्रचंड प्रमाणात टीका झाली. काहींनी हा केवळ चीनची अॅथलीट बाद होत आहे हे लक्षात येताच ज्योतीबाबत घेतलेला एकतर्फी निर्णय होता; तर काहींनी ८० हजार प्रेक्षकांसमोर चीनने ज्योतीचे सुवर्णपदक हिसकावले अशी प्रतिक्रिया दिली.

Asian Games 2023
Asian Games 2023 : जबरदस्त! दिवसाची सुरूवातच डबल धमाक्याने, रोलर स्केटिंगमध्ये भारताची पाठोपाठ दोन पदके

ज्योतीने ही शर्यत १२.९१ सेकंदात पूर्ण केली. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली होती. या शर्यतीचा व्हिडीओ आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी व्हायरल होऊन ज्योतीने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते असे सांगण्यात येत होते. १२.७८ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.