Asian Games IND W vs BAN W : क्रिकेटमध्ये भारताचे रौप्य पदक निश्चित; बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये मारली धडक

India vs Bangladesh
India vs Bangladesh
Updated on

India Women vs Bangladesh Women Asian Games 2023 semifinal : भारताच्या महिला क्रिकेट संघाने 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 51 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून 52 धावा केल्या.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट स्पर्धेत भारत प्रथमच खेळत आहे. आता अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना 25 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी होईल.

India vs Bangladesh
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे उघडले खाते, नेमबाजी अन् रोईंगमध्ये जिंकले रौप्यपदक

उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याची चाल उलटली. पूजा वस्त्राकरने घातल गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 17.5 षटकांत सर्व गडी गमावून 51 धावा केल्या. केवळ कॅप्टन निगार सुल्तानाला दुहेरी आकडा पार करता आला. त्याने 12 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

India vs Bangladesh
Prize Money World Cup 2023 : ICC ने वर्ल्ड कप 2023 साठी बक्षीस रक्कम केली जाहीर, विजेत्यावर होणार कोटींचा वर्षाव

बांगलादेशने भारताविरुद्ध केलेल्या 51 धावा ही महिलांच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या होती. मात्र आता भारतासमोर विजयासाठी 52 धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी 2 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून जेमिमाने सर्वाधिक नाबाद 20 धावा केल्या. तर शेफाली वर्मा 17 धावा करून बाद झाली. भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली विकेट स्मृती मानधनाच्या रूपाने पडली जी 7 धावा करून बाद झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.