IND vs NEP : नेपाळने वाढवलं टेन्शन; अखेर आवेश अन् बिश्नोईनं भारताला सेमी फायनलमध्ये पोहचवत वाचवली लाज

IND vs NEP LIVE Asian Games 2023
IND vs NEP LIVE Asian Games 2023 ESAKAL
Updated on

India Vs Nepal Asian Games Quarter Final : एशियन गेम्स 2023 च्या पुरूष क्रिकेट स्पर्धेतील क्वार्टर फायनल सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा 23 धावांनी पराभव करत सेमी फायनल गाठली. यशस्वी जैसवालच्या 49 चेंडूत केलेल्या 100 धावांच्या जोरावर भारताने नेपाळसमोर 203 धावांचे आव्हान ठेवले होते.

मात्र नेपाळनेही कडवी फलंदाजी करत 9 बाद 179 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून आवेश खान आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीपने 2 विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली. नेपाळकडून दिपेंद्र सिंह ऐरीने सर्वाधिक 32 धावा केल्या.

173-9 (19 Ov) : अखेर आवेश अन् अर्शदीप आले धावून 

नेपाळने भारताच्या 202 धावांच्या प्रत्युत्तरात दमदार फलंदाजी करत 15 षटकात 150 धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यानंतर अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी स्लॉग ओव्हरमध्ये चांगला मारा करत सामन्यावर भारताची पकड निर्माण केली.

120-4 (14 Ov) : नेपाळचीही कडवी फाईट 

भारताच्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या नेपाळने देखील चांगली फलंदाजी करत भारताला चांगलीच फाईट दिली. सलामीवीर कुशल भुर्टेलने 28 तर कुशल मालाने 29 धावांचे योगदान दिले.

यानंतर मधल्या फळीतील दिपेंद्र सिंह ऐरीने 15 चेंडूत 32 धावा ठोकत नेपाळला शतक पार करून दिले.

IND 202/4 (20) : शेवटच्या पाच षटकात रिंकूने केली कमाल

16 व्या षटकात यशस्वी जैसवाल 100 धावा करून बाद झाला त्यावेळी भारताच्या 150 धावा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या पाच षटकात दमदार फलंदाजी करत भारताला 20 षटकात 2 बाद 202 धावांपर्यंत मजल मारून दिली.

150-4  : यशस्वीचे ऐतिहासिक शतक मात्र...

भारताची मधली फळी ढेपाळत असताना भारताचा सलामीवीर यशस्वी जैसवालने 200 च्या स्ट्राईक रेटने 48 चेंडूत 100 धावा ठोकल्या. भारताकडून एशियन गेम्समध्ये शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला.

मात्र शतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याला दिपेंद्र सिंहने बाद केले.

119-3 (12.5 Ov) : दमदार सुरूवातीनंतर भारताची घसरण 

शतकी सलामीनंतर ऋतुराज 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला तिलक वर्मा फक्त 2 धावांची भर घालून माघारी गेला. तर जितेश शर्मा देखील 5 धावा करून बाद झाला. संथ खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना जम बसवणे अवघड होत आहे.

103-1 : कर्णधार ऋतुराज बाद 

यशस्वी जैसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी 10 षटकात शतकी सलामी दिल्यानंतर अखेर नेपाळला ही जोडी फोडण्याची संधी मिळाली. दिपेंदर सिंहने 23 चेंडूत 25 धावा केलेल्या ऋतुराज गायकवाडला बाद केले.

IND 76/0 (7) : यशस्वी जैसवालचे अर्धशतक

यशस्वी जैसवालने दमदार अर्धशथक ठोकत भारताला जवळपास 10 च्या सरासरीने धावा करून दिल्या. भारताने पहिल्या 7 षटकातच 76 धावांपर्यंत मजल मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.