भारताची स्टार बॉक्सर निखत जरीनने एशियन गेम्सच्या राऊंड ऑफ 32 मध्ये दमदार विजय मिळवला. तिने 5 - 0 ने सामना जिंकत पुढची फेरी गाठली.
दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवल्यानंतर, उद्या सकाळी 11:30 वाजता भारतीय वेळेनुसार सुवर्णपदकाच्या लढतीत भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.
ब गटातील सामन्यात भारताला थायलंडकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
भारताच्या पुरुष हॉकी संघाने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने उझबेकिस्तान संघाचा 16-0 असा पराभव केला. या सामन्यात भारतासाठी तीन खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली.
नेमबाजीत भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. रमिताने 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. नेमबाजीतील भारताचे हे दुसरे पदक आहे. आतापर्यंत भारताने 3 रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत.
महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला आहे. यामुळे.... सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा -
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाचे खाते उघडले आहे.....
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा -
Asian Games 2023 Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धाना प्रारंभ झाला आहे यासोबत पदकतालिकेत भारताचे खातेही उघडले आहे. अर्जुन आणि अरविंद या जोडीने रौप्यपदक पटकावले आहे. त्याचबरोबर महिला नेमबाजी संघानेही रौप्यपदकावर निशाणा साधला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे किमान रौप्य पदकही निश्चित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.