India Vs Pakistan Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 मध्ये आज 12 व्या दिवशी भारतीय संघ आपली पदकसंख्या नव्वदीत नेण्यासाठी आपली कंबर कसणार आहेत. आज भारताच्या महिला आणि पुरूष कबड्डी संघासाठी महत्वाचा दिवस आहे. भारतीय पुरूष कबड्डी संघ हा सेमी फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भिडणार आहे.
दुसरीकडे भारतीय महिला कबड्डी संघाने सेमी फायनलमध्ये नेपाळचा 61 - 17 असा मोठा पराभव करत फायनल गाठली आहे. त्यांनी आपले रौप्य पदक निश्चित केले आहे. दुसरीकडे कुस्तीत स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला देखील सेमी फायनलमध्ये पराभूत झाला आहे. त्याला इराणच्या रहमानने 8 - 1 असे पराभूत केले. आता पुनियाला कांस्य पदकासाठी सामना खेळावा लागणार आहे.
भारताने आज महिला आर्चरीमध्ये कांस्य पदक जिंकून पदकसंख्या 87 वर नेली. त्यांनी विएतनामचा पराभव करत कांस्य पदक जिंकले. याचबरोबर भारतीय पुरूष क्रिकेट संघाने बांगलादेशविरूद्धचा सेमी फायनल सामना आरामात जिंकत अंतिम फेरी गाठली.
भारतीय क्रिकेट संघाने रौप्य पदक निश्चित केले असले तरी पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये खेळणाऱ्या ऋतुराजच्या नेतृत्वाखालील संघाचा डोळा हा सुवर्ण पदकावरच असणार आहे. दुसरीकडे बॅडमिंटनमध्ये देखील पुरूष एकेरीत प्रणॉय हा सेमी फायनल सामना खेळत आहे. जर त्याने हा सामना जिंकला तर बॅडमिंटन पुरूष एकेरीत अंतिम फेरीत धडक मारणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.