Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेचे आज औपचारिक उद्‌घाटन

४५ देशांतील खेळाडूंचा ४० क्रीडा प्रकारांमध्ये पदकासाठी कस लागणार
asian games
asian games sakal
Updated on

हांग् चौऊ - चीनमधील हांग्‌ चौऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहे. काही खेळांच्या स्पर्धांना सुरुवातही झाली आहे. मात्र या आशियातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन उद्या (ता. २३) होणार आहे. या क्रीडा महोत्सवात ४५ देशांतील खेळाडू ४० क्रीडा प्रकरांमध्ये पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील.

आशियाई स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान पार पडणार आहेत. हांग्‌ चौऊ यासह आणखी पाच शहरांमध्ये स्पर्धा शर्यतींचा धमाका पाहायला मिळणार आहे. रोलर स्केटिंग खेळातील दोन प्रकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ४८१ सुवर्णपदकांसाठी आशियातील खेळाडू प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहेत.

भारताचा चमू सज्ज

भारताकडून आशियाई स्पर्धेसाठी ६५५ खेळाडूंचा चमू पाठवण्यात आला आहे. खेळाडूंसोबत २६० प्रशिक्षक व सहाय्यक स्टाफचाही समावेश आहे. भारताचा आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक संख्येचा हा चमू ठरला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंकडून यंदा पदकाची शंभरी पूर्ण करण्याची आशा बाळगली जात आहे.

asian games
Asian Games 2023 : चीनचा पुन्हा खोडसाळपणा; अरूणाचल प्रदेशच्या खेळाडूंना नाकारला व्हिसा?

या खेळाडूंकडून पदकांची आशा

भारताला काही खेळांमधून हमखास पदक मिळण्याची आशा आहे. क्रिकेट या खेळामध्ये पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत भारताला पदके मिळू शकतील. क्रिकेटप्रमाणे हॉकी या खेळातही भारताला दोन्ही (पुरुष व महिला) अशा दोन्ही गटांत पदकाची अपेक्षा करता येणार आहे. याशिवाय भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॉक्सर अंतिम पंघाल, बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी-सात्विक साईराज रंकीरेड्डी, वेटलिफ्टर मीराबाई चानू, ॲथलीट अविनाश साबळे व ज्योती यराजी, तिरंदाज ज्योती वेन्नम या खेळाडूंकडून भारताला हमखास पदक मिळण्याची आशा आहे.

asian games
Asian Games 2023 : सुनील छेत्रीच्या पेनल्टी गोलचा दिलासा, भारताची बांगलादेशावर निसटती मात

हरमनप्रीत, लवलिना भारताचे ध्वजवाहक

हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग व ऑलिंपिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हे आशियाई स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असणार आहेत. भारतीय पथकाचे प्रमुख भूपेंदर सिंग बाजवा याप्रसंगी म्हणाले की, ध्वजवाहकाबाबत आम्ही एकमताने निर्णय घेतला आहे. यंदाच्या आशियाई स्पर्धेसाठी दोन ध्वजवाहक निवडण्यात आले आहेत. हरमनप्रीत सिंग व लवलिना बोर्गोहेन यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

asian games
Asian Games 2023 : 3189 पदकं जिंकून कोणत्या देशानं एशियन गेम्समध्ये निर्माण केलाय आपला दबदबा?

महत्त्वाचे

२३ सप्टेंबरला उद्‌घाटन

८ ऑक्टोबरला सांगता सोहळा

४५ देशांतील खेळाडूंचा सहभाग

४० क्रीडा प्रकारांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.