Asian Games 2026 Japan: नागोया या शहरात होणाऱ्या २०२६ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंच्या निवासासाठी पारंपरिक अशा क्रीडानगरीची संकल्पना रद्द करण्यात आली आहे. सहभागी होणाऱ्या सर्व देशांच्या खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था हॉटेलमध्ये आणि मोठ्या जहाजांवर करण्यात येणार आहे, परंतु भारतासह काही देशांच्या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ऑलिंपिक कॉन्सिल ऑफ एशियाड यांच्या ४४व्या संमेलनात बोलताना जपान ऑलिंपिक समितीचे माजी अध्यक्ष त्सुनेकाझु ताकेदा यांनी २०२६ची ऑलिंपिक नागोया शहरात होईल आणि तेथे क्रीडानगरीची व्यवस्था नसेल, असे त्यांनी सांगितले.
या आशियाई स्पर्धेतील खेळ दोन ठिकाणी होतील आणि त्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी आम्ही सर्वोत्तम निवासाची व्यवस्था करणार आहोत. पारंपरिक क्रीडानगरीऐवजी हॉटेल आणि मोठ्या जहाजांवर खेळाडू राहतील.