Asian Games Trials : दिल्ली उच्च न्यायालयाचा विनेश, बजरंगला दिलासा; याचिका फेटाळली

Asian Games Wrestling Trials
Asian Games Wrestling Trials esakal
Updated on

Asian Games Wrestling Trials : दिल्ली उच्च न्यायालयाने भारताचे अव्वल कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना मोठा दिलासा दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आज (दि.22) बजरंग आणि विनेशला एशियन गेम्सच्या चाचणीतून सूट देण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Asian Games Wrestling Trials
Harmanpreet Kaur : पुढच्या वेळी बांगलादेशमध्ये येताना... तोंडचा विजयी घास हिरावल्यानंतर हरमन एवढी का भडकली?

20 वर्षाखालील वर्ल्ड चॅम्पियन अमित पांघल आणि 23 वर्षाखालील एशियन चॅम्पियन सुजीत कालकल यांनी विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना एशियन गेम्स 2023 मध्ये थेट सहभागी होण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका न्यायमूर्ती एस. प्रसाद यांनी फेटाळून लावली.

या आदेशाची सविस्तर प्रत अजून उपलब्ध झालेली नाही. विनेश फोगाट ही 53 किलो वजनी गटात आणि बजरंग पुनिया हा 65 किलो वजनी गटात खेळतो. त्यांना चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 साठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या एडहॉक समितीने थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.

Asian Games Wrestling Trials
BANW vs INDW 3rd ODI : 4 चेंडू, 1 धाव अन् 1 विकेट... भारत ना जिंकला ना हरला; सामन्यासह मालिकाही 'विभागून'

विनेश आणि बजरंगला यासाठी निवड चाचणीला सामोरे जावे लागणार नाही. मात्र इतर कुस्तीपटूंना 22 आणि 23 जुलैला होणाऱ्या निवड चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. याविरूद्ध पांघल आणि कालकल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात 19 जुलैला याचिका दाखल केली होती. यावेळी त्यांनी निवड चाचणी निष्पक्ष व्हावी अशी मागणी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.