Asian Hockey 5s World Cup Qualifiers: भारताने दिवसात केले तब्बल 42 गोल, एकट्या जपानची 35 वेळा भेदली गोलपोस्ट

Asian Hockey 5s World Cup Qualifiers
Asian Hockey 5s World Cup QualifiersESAKAL
Updated on

Asian Hockey 5s World Cup Qualifiers : भारतीय पुरूष हॉकी संघाने गुरूवारी ओमानच्या सलालाहमध्ये झालेल्या पुरूष हॉकी 5 एस वर्ल्डकप पात्रता फेरीत पहिल्या सामन्यात मलेशियाला 7-5 तर दुसऱ्या सामन्यात जपानचा तब्बल 35-1 गोल फरकाने पराभव केला. मनिंदरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय पुरूष हॉकी संघाने लीगमधील आपल्या शेवटच्या सामन्यात मोठा धमाकाच केला.

भारतीय संघाने जपानचा 35 - 1 असा पराभव केला. याबरोबरच भारताने सेमी फायनलमध्ये देखील प्रवेश केला आहे. भारतासमोर जपानचा संघ हा हतबल वाटत होता. पहिल्या पाच मिनिटातच जपानवर सात गोल झाले होते. यानंतर भारतीय संघाने जपानवर कोणतीच दयामाया दाखवली नाही.

भारताकडून मनिंदर सिंहने केले 10 गोल

भारताकडून जपानविरूद्धच्या सामन्यात मनिंदर सिंहने तब्बल 10 गोल केले. त्याने (1′, 3′, 5, 6′, 9′, 15′, 20′, 24′, 25′, 29′) असे 10 गोल करत जपानच्या गोलकिपरवर चांगलाच दबाव टाकला. मनिंदर सिंहसोबतच मोहम्मद राहिलने (3′, 4′ , 11′, 12′, 17′, 26, 26′) सात, पवन राजभरने (2′, 6′, 10′, 13′, 23′) पाच तर गुरजोत सिंहने (12′, 20′, 21′, 27′, 30′) पाच गोल केले.

त्यापाठोपाठ शुखविंदरने (4′, 8′, 16′, 22′) चार, मनदीप मोरने (18′, 23′, 29′) तीन आणि जुगराज सिंहने (15′) एक गोल केला. जपानकडून मसाताका कोबोरीने एकमेव गोल केला.

भारतीय संघाने या सामन्यापूर्वी मलेशियाला देखील पराभवाची धूळ चारली होती. भारताने मलेशियाचा 7 - 5 असा पराभव केला होता. या सामन्यात भारताकडून गुरजोतने 5 तर मनिंदर आणि राहिलने प्रत्येकी 1 गोल केला होता. मलेशियाकडून आरिफ इशाकने, इस्माईल अबू, मोहम्मद दीन, कमरूलजमां कमरूद्दीन आणि सियारमन मॅटने प्रत्येकी 1 गोल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.