Asian Kabaddi Championship 2023 : भारताला विजेतेपद; पण इराणने दिला इशारा

आशिया अजिंक्यपद कबड्डी ः पवन, अस्लम, देसवाल यशाचे मानकरी
asian kabaddi championship 2023 india beat iran pawan sehrawat mohammadreza shadloui
asian kabaddi championship 2023 india beat iran pawan sehrawat mohammadreza shadlouisakal
Updated on

बुसान : संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा पराक्रम करणाऱ्या भारताने सलग दोनदा इराणचा पराभव करून आशिया अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतले विजेतेपद आपल्याकडेच राखले. हा सामना भारताने ४२-३२ असा जिंकला असला, तरी अखेरच्या काही मिनिटांत श्वास कंठाशी येणारी परिस्थिती निर्माण झाली होती.

कर्णधार पवन कुमारने चढायांत १३ गुण मिळवत निर्णायक कामगिरी केली. त्याला महाराष्ट्राच्या अस्लम इनामदार, अर्जुन देसवाल यांनी मोलाचे योगदान दिले. ही ११ वी आशिया अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा असून भारताने सर्वाधिक ८ वेळा विजेतेपद मिळवले आहे.

२०१६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची मक्तेदारी मोडून इराणने सुवर्णपदक मिळवले होते. त्या अपयशावर आज काही प्रमाणात मलमपट्टी झाली असली, तरी इराणने या स्पर्धेत फझल अत्राचलीसह आपल्या सर्व सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली आणि नवोदितांना मैदानात उतरवले होते.

आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हांगझाऊ येथे आशियाई स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी बुसान येथील ही स्पर्धा पूर्वतयारी म्हणून समजली जात आहे.

इराणकडून मोहम्मद्रेझा शाल्दलोईने पकडींबरोबर चढायांत शानदार कामगिरी केली. तो प्रो कबड्डीत पाटणा पायरेटस संघातून खेळत असल्यामुळे त्याला प्रो कबड्डीचा चांगला अनुभव आहे. आजच्या सामन्यात साईद गफारी, मोईन शाफागई यांनीही ठसा उमटवणारा खेळ केला.

asian kabaddi championship 2023 india beat iran pawan sehrawat mohammadreza shadloui
WI vs IND Team India : तिकीटाचा गोंधळ! अमेरिका, लंडन अन् नेदरलँड करत भारतीय संघ अखेर पोहचला विंडीजमध्ये

भारताच्या वर्चस्वानंतर कलाटणी

सामन्याच्या पहिल्याच चढाईत पकड होऊनही त्यानंतर आपले कौशल्य दाखवणाऱ्या पवन कुमारने भारताला मध्यांतरला २३-११ असे आघाडीवर ठेवले होते. उत्तरार्धात सहाव्या मिनिटापर्यंत ही आघाडी ३३-१४ अशी केली, तेव्हा भारत एकतर्फी विजय मिळवणार, असे चित्र होते; परंतु तेथूनच सामन्याला कलाटणी मिळत गेली.

भारताला ३; तर इराणला १४ गुण

पुढच्या आठ मिनिटांच्या खेळात इराणने भारतावर लोण देत पिछाडी झपाट्याने कमी केली. या आठ मिनिटांत भारताला तीनच गुण मिळवता आले, तर इराणने १४ गुणांची कमाई केली. त्यामुळे गुणफलक ३६-२८ असा भारताच्या बाजूने असला, तरी धोक्याचा इशारा देत होता.

asian kabaddi championship 2023 india beat iran pawan sehrawat mohammadreza shadloui
BB OTT 2 Weekend Ka Vaar: बिग बॉसमध्ये झालं पहिलं एलिमिनेशन! कुणाचा पत्ता झाला कट?

पवन कुमारची झालेली सुपर टॅकल त्याच अनुभवी मध्यरक्षक सुरजीतही बाद झाला होता. अशा परिस्थितीत अखेरची दोन मिनिटे असताना भारताकडे ३८-३१ एवढीच आघाडी होती.

...तर भारत हरू शकला असता

सामना संपायला अखेरचे दीड मिनीट शिल्लक असताना गुणफलक ३९-३२ अशा स्थितीत होता आणि भारताकडे अस्लम इनामदार हा एकमेव खेळाडू शिल्लक होता. त्याची चढाई `डू ऑर डाय` होती पण त्यात त्याने बोनसचा गुण मिळवला.

asian kabaddi championship 2023 india beat iran pawan sehrawat mohammadreza shadloui
USA Vs Iran : इराणच्या दादागिरीमुळे अमेरिकेचा संताप! अरब प्रदेशात वाढवणार लष्करी सामर्थ्य

इराणकडून मोहम्मद्रेझा चढाईला आणि भारताकडे अस्लम हा एकटाच बचाव करत होता तो मोहम्मद्रेझाला चकवत होता; परंतु अस्लमचा पाय बाह्यरेषेला लागल्याचा समज करत तो स्वतःच्या भागात परतला; परंतु अस्लमने तशी कोणतीच चूक केली नव्हती. त्यात मोहम्मद्रेझाची ती `डू ऑर डाय` चढाई होती.

त्यामुळे गुण न मिळवल्यामुळे तो बाद झाला आणि ती सुपर टॅकल असल्याने भारताला आयते दोन गुण मिळाले. यावेळी अस्लम बाद होणे सोपे होते तसे झाले असते, तर इराणला लोणचे दोन असे एकूण तीन गुण मिळू शकले असते आणि पुढच्या एक दोन चढायांत काहीही घडू शकले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.