Asian Kabaddi Championship 2023 : तब्बल आठवे विजेतेपद! कबड्डीत फक्त भारताचाच शड्डू घुमतो; इराणला लोळवले

Asian Kabaddi Championship 2023
Asian Kabaddi Championship 2023esakal
Updated on

Asian Kabaddi Championship 2023 : दक्षिण कोरिया येथील बुसान येथे झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने इराणचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. भारताने इराणचा 42 - 32 असा पराभव करत आठव्यांदा एशियन कबड्डी चॅम्पियनशिपवर कब्जा केला. भारताचा कर्णधार पवन शेरावतने सुपर 10 पाईंट्स मिळवत विजयात मोठा वाटा उचलला.

Asian Kabaddi Championship 2023
BCCI Ambati Rayudu : अंबाती रायुडूने BCCI ला लावलं कामाला; निवृत्त खेळाडूंबाबतचे नियम बदलणार?

सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटात भारतीय पुरूष संघाने इराणवर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर सामन्याच्या 10 व्या मिनिटाला इराणचा संपूर्ण संघ बाद झाला. पवन शेरावत आणि अस्लम इनमादारने यशस्वी रेड केली होती. त्याचबरोबर काही टॅकल पॉईंट देखील मिळवले.

या दमदार सुरूवातीनंतर भारतीय कबड्डी संघाने आपली लीड सहजरित्या वाढवली. भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी केली. इराणला काही बोनस पॉईंट देखील मिळाले मात्र सामन्याच्या 19 व्या मिनिटाला भारतीय संघाने पुन्हा एकदा ऑल आऊट केले.

Asian Kabaddi Championship 2023
ODI World Cup 2023 : ख्रिस गेलची भविष्यवाणी! 'हा' संघ होणार वर्ल्ड चॅम्पियन

पहिल्या हाफपर्यंत भारतीय संघ 23 - 11 असा आघाडीवर होता. मात्र इराणचा कर्णधार मोहम्मदरझा शादलोई चियानेह याने 29 व्या मिनिटाला दोन रेड पॉईंट आणि सुपर रेडच्या जोरावर भारताला ऑल आऊट केले. सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना इराणनने भारताची आघाडी 38 - 31 अशी कमी केली.

मात्र दबावाच्या वातावरणात देखील भारतीय संघाने सामना 42 - 32 असा जिंकत आपले आठवे विजेतेपद पटकावले. एशियन कबड्डी चॅम्पियनशिप 2023 चे आतापर्यंत 9 एडिशन झाले आहेत. त्यातील 8 एडिशनमध्ये भारताने विजेतेपद पटकावले आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()