कोरोनाची भीती कायम! चीनमधील आशियाई पॅरा गेम्स स्थगित

Asian Para Games Postpone by China Due To Corona
Asian Para Games Postpone by China Due To Corona esakal
Updated on

आशियाई पॅरा गेम्स (Asian Para Games) ही येत्या ऑक्टोबर 9 ते 15 दरम्यान चीनमध्ये हांगझोहू मध्ये होणार होत्या. मात्र चीनने ही स्पर्धा कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावाच्या भीतीपोटी स्थगित केली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ही आज करण्यात आली आहे.

Asian Para Games Postpone by China Due To Corona
'धोनी शिवाय सीएसकेची कल्पना करा'; रैनाची पोस्ट व्हायरल

आशियाई पॅरोलम्पिक समितीने आपल्या प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात म्हटले की, 'हांगझोहू येथे 2022 मध्ये होणाऱ्या पॅरा गेम्सची आयोजक समिती (HAPGOC) आणि आशियाई पॅरालम्पिक समिती (APC) आज घोषणा करत आहे की 9 ते 15 ऑक्टोबरमध्ये होणारे 2022 आशियाई पॅरा गेम्स स्थगित करण्यात आले आहे. आशियाई पॅरालम्पिक समितीच्या टास्क फोर्स आणि आयोजक समिती ही स्पर्धा 2023 मध्ये घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. याबाबतची पुढची घोषणा येत्या काळात करण्यात येईल.'

Asian Para Games Postpone by China Due To Corona
मुंबईच्या तिलक वर्मासाठी खुद्द सुनिल गावसकरांची 'बॅटिंग'

यापूर्वी हांगझोहू येथेच 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशियाई स्पर्धा देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. याबाबतची घोषणा 6 मे रोजी करण्यात आली होती. त्यावेळी चीनमध्ये कोरोना बाधितांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती.

Asian Para Games Postpone by China Due To Corona
IPL 2022: नेट रनरेट कसा काढतात रे भाऊ?

आशियाई पॅरालम्पिक समितीचे अध्यक्ष माजिद राशीद यांनी सांगितले की, या स्पर्धेत 4000 पेक्षा जास्त खेळाडू 616 खेळ प्रकारात भाग घेणार होते. या स्पर्धेची तयारी चांगल्या प्रमकारे सुरू होती आणि आयोजकांनी देखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. आता आम्ही आयोजकांबरोबर नव्या तारखा जाहीर करण्याबाबत काम करत आहोत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.