Maharashtra Kabaddi Team : महाराष्ट्राच्या संघाची घोषणा! ठाण्याचा अस्लम इनामदार कर्णधारपदी नियुक्ती

वरिष्ठ विभाग राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा
Aslam Inamdar
Aslam InamdarSakal
Updated on

अहमदनगर : वरिष्ठ पुरुष विभाग राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली असून ठाण्याच्या अस्लम इनामदार याच्याकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. नाशिकचा आकाश शिंदे महाराष्ट्राच्या संघाचा उपकर्णधार असणार आहे. २१ मार्चपासून अहमदनगरमधील क्रीडा संकुलात या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

अहमदनगर येथे डिसेबर, २०२२ मध्ये झालेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून, तसेच नुकत्याच ठाणे येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेतून २९ जणांचा संघ निवडण्यात आला.

नगर येथे या सर्व निवडलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर घेण्यात येऊन त्यातून अखेर १२ जणांचा संघ जाहीर करण्यात आला. निवडण्यात आलेल्या या संघात विजेत्या मुंबई शहर आणि उपविजेत्या अहमदनगर संघाचे प्रत्येकी ३-३ खेळाडू असून ठाणे, नाशिक, रायगड, नांदेड, मुंबई उपनगर, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या प्रत्येकी एका खेळाडूंचा समावेश आहे.

हरियाना येथील चरखी- दादरी येथे झालेल्या वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ भारतीय रेल्वेकडून पराभूत झाल्याने उपविजेता ठरला होता. जानेवारी २०१९ साली रोहा, रायगड येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने तृतीय क्रमांक प्राप्त केला होता.

अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू शांताराम जाधव यांच्या मार्गदर्शनात हा संघ जेतेपद मिळविण्याच्या इराद्याने या स्पर्धेत उतरणार आहे. संघ निवड कागदावर तरी समतोल दिसत आहे. प्रत्यक्षात मैदानावर तो संघ कसा खेळतो यावर सर्व काही अवलंबून आहे.

वरिष्ठ पुरुष संघ ः १) अस्लम इनामदार- संघनायक (ठाणे), २) आकाश शिंदे- उपसंघनायक (नाशिक), ३) संकेत सावंत (मुंबई शहर), ४) आदित्य शिंदे (अहमदनगर), ५) मयूर कदम (रायगड), ६) हर्ष लाड (मुंबई शहर), ७)

शंकर गदई (अहमदनगर), ८) किरण मगर (नांदेड), ९) अरकम शेख (मुंबई उपनगर), १०) प्रणय राणे (मुंबई शहर), ११) ओमकार कुंभार (रत्नागिरी), १२) शुभम राऊत(अहमदनगर). मुख्य प्रशिक्षक : शांताराम जाधव. सहाय्यक प्रशिक्षक : दादासो आवाड. व्यवस्थापक : शंतनू पांडव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()