PM Modi in Sydney : आमचं जवळचं कोणीतरी गेलं... पीएम मोदींनी सिडनीत काढली शेन वॉर्नची आठवण

PM Modi in Sydney Shane Warne
PM Modi in Sydney Shane Warne esakal
Updated on

PM Modi in Sydney Shane Warne : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. आज (दि.23) त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे त्यांनी ऑस्ट्रोलियामध्ये स्थायिक भारतीयांना संबोधित केले. एरिना स्टेडियममध्ये हजारो भारतीयांच्या उपस्थितीत पीएम मोदी फक्त आपल्या लोकांबाबत बोलले नाही तर त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांबद्दल देखील खुलेपणाने आपले विचार ठेवले. यावेळी ते ऑस्ट्रेलियाचा दिवंगत महान क्रिकेपटू शेन वॉर्नबद्दलही बोलले. ज्यावेळी शेन वॉर्नचे निधन झाले त्यावेळी भारतीय देखील कसे दुःखात होते हे त्यांनी सांगितले.

PM Modi in Sydney Shane Warne
Virat Kohli : कोण प्रिन्स अन् कोण किंग? गिलला गोंजारत लखनौने विराटला डिवचले

पीएम मोदींनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटच्या संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्याचेही सांगितले. क्रिकेटच्या मैदानावर सामना जितका रंजक होतो तेवढची आपली ऑफ द फिल्ड मैत्री घट्ट होते. या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या अनेक महिला क्रिकेटपटू देखील पहिल्यांदा भारतात आयपीएल खेळण्यासाठी आल्या. यात मेग लेनिंग, एलिस पेरी आणि एलिसा हिलीसह अनेक नावाजलेल्या क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला.

PM Modi in Sydney Shane Warne
Ravindra Jadeja MS Dhoni Controversy : धोनीसोबत फाटल्याची चर्चा; त्यात जडेजा पती - पत्नींचा ते ट्विट...

मोदी शेन वॉर्नबद्दल बोलताना म्हणाले की, 'आपण फक्त सुखात एकमेकांचे साथी आहोत असे नाही. चांगला मित्र सुखात आणि दुःखात देखील साथ देतो. गेल्या वर्षी महान शेन वॉर्नचे निधन झाले. त्यावेळी ऑस्ट्रेलियासकट करोडो भारतीयांनी देखील दुःख व्यक्त केले. आम्हाला असं वाटलं की आम्ही आपल्या कोणाला तरी गमावलं आहे. शेन वॉर्नचं 4 मार्च 2022 ला निधन झाले होते. तो आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेते राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()