KL Rahul- Athiya Wedding: केएल राहुल-आथियाच्या लग्नाची जय्यत तयारी; VIDEO व्हायरल

विद्युत रोषणाईने झळाळला क्रिकेटरचा बंगला
KL Rahul- Athiya Wedding:
KL Rahul- Athiya Wedding:esakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून भारताच धडाकेबाज फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टा यांच्या लग्चाच्या चर्चेला उत आला आहे. दरम्यान, काही फोटो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. पाली हिल्स बंगल्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

गेल्यावर्षीपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र मध्यंतरी केएल राहुलवर झालेली शस्त्रक्रिया आणि विविध सामन्यांमुळे हे लग्न पुढं ढकलल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Sikander Sheikh : मोठ्या वादानंतर सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड पुन्हा कुस्तीच्या मैदानात भिडणार?

लग्नाच्या चर्चेदरम्यान त्यांचा पाली हिल्स बंगाल्यावर सुंदर अशी विद्युतरोषणाई करण्यात येत आहे. त्यामुळे लग्नाची तयारी सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. केएल राहुलच्या नावाने एका इन्स्टा पेच आहे त्यावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. Wedding preps have started🥳❤️अशी कॅप्शनदेखील देण्यात आली आहे.

केएल राहुल किंवा अथिया शेट्टी यांच्याकडून लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्याची सुरुवात सजावटीपासून झालेली दिसून येत आहे. त्यांच्या पाली हिल्सवरील प्रसिद्ध बंगल्यावर मोठ्या प्रमाणात विद्युतरोषणाई केली जात आहे.

Ranji Trophy: निवडकर्त्यांचे तोंड बंद! सर्फराजचे खणखणीत शतक; अजिंक्य रहाणे मात्र...

फिल्मीज्ञानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये हा पाली हिल्स बंगला विद्युतरोषणाईने झळाळून निघाला आहे. त्यामुळे या सेलिब्रेटी कपल्सच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()