Ashes टेस्टमधील बेस्ट सीन; KKR ला आठवला धोनी वर्सेस गंभीर सामना

AUS vs ENG Ashes classic move in Test cricket
AUS vs ENG Ashes classic move in Test cricketTwitter
Updated on

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सिडनीतील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पाचव्या आणि अखेरच्या दिवसात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट घेतल्या. पण अखेरच्या टप्प्यात त्यांना अनुभवी जीमी (James Anderson) आणि ब्रॉड (Stuart Broad) जोडी फोडता आली नाही. परिणामी सामना अनिर्णित राहिला. शेवटच्या काही षटकात पॅट कमिन्सन जी फिल्डिंग लावली होती ती एक अद्भभूत नजारा दाखवून देणारी होती. पण विजयी चौकार मारण्याचा त्यांचा मोका चुकलाच. या मोक्याच्या क्षणी टेस्ट मॅचमध्ये पडणारा प्रत्येक चेंडू क्रिकेट चाहत्याच्या काळजाचा ठोका चुकवणारा असाच होता.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 91. 2 षटकात मागच्या डावातील शतकवीर जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow) रुपात इंग्लंडला आठवा धक्का बसला. या धावफलकावर इंग्लंडच्या धावफलकावर 237 धावा होत्या. त्यानंतर 64 चेंडू फेकले गेले. मुख्य गोलंदाजाला यश मिळत नाही हे लक्षात आल्यावर पॅट कमिन्स (Pat Cummins) आपल्या पार्ट टाईम बॉलरकडे गेला. त्याने चेंडू स्मिथच्या (Steven Smith) हाती सोपवला. स्मिथनेही जॅक लीचला बाद करत आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. जॅक लीच (Jack Leach) 34 चेंडूत 24 धावा करुन तंबूत परतला. इंग्लंडची अवस्था 9 बाद 270 अशी होती.

AUS vs ENG Ashes classic move in Test cricket
VIDEO : फिल्डर्संनी बॉलरलाच बाउंड्री अडवायला पळवलं!

ऑस्ट्रेलियाला आता मॅच जिंकण्यासाठी एकमेव विकेट्सची गरज होती. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे काही वेळ मारुन नेतील असे वाटत नव्हते. त्यांच्या विकेटसाठी पॅट कमिन्सनं खतरनाक फिल्डिंग लावली. पण इंग्लंडची ही जोडीनं चक्रव्यूहात अडकली नाही. आधी ब्रॉडनं लायनची आणि त्यानंतर जेम्स अँडरसनने स्मिथची ओव्हर निर्धाव खेळून काढत विकेट न देता सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला.

AUS vs ENG Ashes classic move in Test cricket
AUS vs ENG: इंग्लंडच्या शेपटानं कांगारुंचा चौकार अडवला; मॅच ड्रॉ

ऑस्ट्रेलियाने जी फिल्डिंग लावली होती. त्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. यापूर्वीही अनेकदा टेस्टमध्ये फिल्डिंगचा बेस्ट सेटअप पाहायला मिळाला आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सवाल्यांना या सीनमुळे आयपीएलमधील एका सामन्याची आठवण झाली. त्यांनी दोन्ही फोटो एकत्रित करुन या आठवणीला उजाळा दिलाय.

पुणे सुपर जाएट्स (Pune Supergiants) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान अशीच फिल्डिंग सजवल्याचे पाहायला मिळाले होते. 14 मे 2016 या दिवशी ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पुण्याच्या संघाने 74 धावांवर 10.3 षटकात चौथी विकेट गमावली होती. ही विकेट पडल्यावर धोनी (Mahendra Singh Dhoni) मैदानात आला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीला जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीरने (Gautam Gambhir) क्लोज फिल्डिंगचा फॉर्म्युला आजमावला होता. धोनीनं या सामन्यात 8 धावा केल्या होत्या. या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार कोलकाताच्या बाजूनं लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.