नशीबवान स्टोक्स! बॉल स्टम्पला लागूनही नाबाद; सचिन म्हणाला....

Sachin on Ben Stokes
Sachin on Ben Stokes Sakal
Updated on

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Aus vs Eng )यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Test ) चौथा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात सुरु आहे. तिसऱ्या दिवशीच्या खेळात एक आश्चर्यकारक सीन पाहायला मिळाला. कॅमरुन ग्रीन (Cameron Green) याने टाकेला एक चेंडू ऑफ स्टम्पला लागला. पण बेल्स न पडल्याने बेन स्टोक्स (Ben Stokes) नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियन खेळाडू या घटनेनंतर आवाक झाले.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडच्या आघाडीचे कंबरडे मोडले. या सेशनमध्ये इंग्लंडने चार विकेट्स गमावल्या होत्या. लंचनंतर दुसरा सेशन बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी बेयरस्टोनं (Jonny Bairstow) गाजवला. दोघांनी शतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला.

स्टोक्सने या सामन्यात महत्त्वपूर्ण अर्धशतक केले. यात त्याला नशिबाची साथ मिळाली. तो 16 धावांवर खेळत असताना अंपायरने पहिल्यांदा त्याला LBW च्या रुपात आउट दिले. त्याने बॉल आणि पॅडचा संपर्क नसल्याचे सांगत रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्येही ते स्पष्ट झाले. पण यावेळी चेंडू ऑफ स्टम्पला लागल्याचे दिसत होते. पण नियमानुसार बेल्स पडली नसल्यामुळे त्याला नाबाद ठरवण्यात आले.

शेन वॉर्न (Shane Warne) यावेळी कॉमेंट्री करत होता. हा सीन पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. अंपायरने आउट कसे दिले? असा प्रश्न वॉर्नला पडल्याचे पाहायला मिळाले. त्याच्याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) ट्विटच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यासंदर्भात मजेशीर ट्विट केले आहे. बॉल स्टम्पला लागल्यानंतर बेल्स पडली नाही. यासंदर्भात नवा नियम करायला पाहिजे का? असा प्रश्न त्याने उपस्थितीत केला. मित्रा तुला काय वाटते असा प्रश्न करत त्याने शेन वॉर्नला टॅगही केले आहे. दिनेश कार्तिकनेही यावर प्रतिक्रिया दिलीये. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, जेव्हा तुम्ही ऑफ स्टम्पवर भरवसा ठेवता आणि स्टम्प तुमच्यावर भरवसा दाखवते त्यावेळी हा सीन पाहायला मिळतो, अशा शब्दात कार्तिक व्यक्त झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.