Ireland Series : आयर्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

Ireland Series
Ireland Series
Updated on

Aus vs Ire ODI Series : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका खेळल्या जात आहे. पुरुषांच्या अॅशेसबरोबरच महिलांच्या ऍशेसही खेळल्या गेली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा दिसू आला. या मालिकेतील एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला आहे. यानंतर त्याला तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिकाही खेळायची आहे.

या दौऱ्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन संघ आयर्लंडचाही दौरा करणार आहे. जिथे त्यांना तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यावर अ‍ॅलिसा हिलीकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

Ireland Series
Ashes 2023 : 'डोकं नसल्यासारखं फलंदाजी...' माजी खेळाडू इंग्लंडवर जाम भडकले

ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात खेळली जाणारी ही मालिका जुलै महिन्यात होणार आहे. अॅशेसनंतर लगेचच ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडमधील डब्लिनला रवाना होणार आहे. जिथे त्याला 23 जुलै रोजी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. या मालिकेतील दुसरा सामनाही याच स्टेडियमवर 25 जुलैपासून खेळला जाणार आहे. मालिकेतील तिसरा सामना 28 जुलै रोजी त्याच मैदानावर खेळवला जाईल. या मालिकेतील तिन्ही सामने आयसीसी महिला वनडे चॅम्पियनशिपचा भाग आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली आहे.

Ireland Series
IND vs PAK World Cup 2023 : पाकिस्तानचं आता नवं नाटक; म्हणे भारतात येणार अन् सुरक्षेची तपासणी करणार

आयर्लंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाली, तेव्हा त्या संघात एका खेळाडूच्या नावही समाविष्ट करण्यात आले होते. ती आता आपल्याच देशाविरुद्ध सामने खेळणार आहे. ही खेळाडू दुसरा कोणी नसून किम गर्थ आहे. इंग्लंड दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळणारी किम गर्थ आता तिचा माजी संघ आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे.

किम गर्थने 2010 मध्ये आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती आयर्लंडकडून अनेक सामने खेळला आहे. पण 2020 मध्ये तिने ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर ती आपल्या माजी संघाविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल.

आयर्लंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - एलिसा हिली, डीआर्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.