'all lives are equal' नंतर उस्मान ख्वाजाने फोडले नव्या वादाला तोंड! आता मैदानात केले 'हे' कृत्य

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. यादरम्यान उस्मान ख्वाजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे....
Australia cricketer Khawaja wears a black armband after a ban on his all lives are equal shoes cricket news in marathi
Australia cricketer Khawaja wears a black armband after a ban on his all lives are equal shoes cricket news in marathisakal
Updated on

Usman Khawaja latest News : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. यादरम्यान उस्मान ख्वाजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेचे कारण म्हणजे पुन्हा एकदा इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्ध आहे.

एक-दोन दिवसाआधी उस्मान ख्वाजाने ऑल लाईव्ह्ज आर इक्वल असा मेसेज लिहिलेला बुट घातला होता. पण आता पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी तो फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने हातावर काळी पट्टी बांधली होती. त्यामुळे वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. 

Australia cricketer Khawaja wears a black armband after a ban on his all lives are equal shoes cricket news in marathi
Mohammed Shami : गर्व से कहता हूं कि मुस्लिम हूं..! सजदा वादावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य

उस्मान ख्वाजा पुन्हा का आला चर्चेत?

आयसीसीने बुधवारी ख्वाजाला त्याचे ते बुट घालण्यास परवानगी दिली नाही. ज्यावर गाझा संदर्भातील काही मेसेज लिहिले होते. पाकिस्तानी वंशाच्या या क्रिकेटपटूने मंगळवारी सराव सत्रात जे बूट घातले होते. त्यावर ऑल लाईव्ह्ज आर इक्वल असा मेसेज लिहिलेले होते.

ICC नियम राजकीय किंवा धार्मिक विधाने प्रदर्शित करण्यास परवानगी देत ​​​​नाहीत. यावर ख्वाजाने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे आणि सर्व अधिकार समान आहेत. मी त्यांच्यावर विश्वास ठेवणे कधीच बंद करणार नाही.

पण आज कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी ख्वाजा आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सलामीला आले. पाकिस्तानात जन्मलेला ख्वाजा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळणारा पहिला मुस्लिम खेळाडू आहे. गाझामधील लोकांशी एकता दर्शविण्यासाठी त्याने हाताला काळी पट्टी बांधली होती.

सामन्यापूर्वी त्याने एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की, इतर क्रिकेटपटूंना इतर गोष्टींसाठी समर्थन दर्शविण्याची परवानगी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. मला हे थोडे निराश वाटले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सशिवाय ख्वाजाला देशाचे फेडरल कोषाध्यक्ष जिम चालमर्स यांनीही पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.