Aus Beat SA: पॅट कमिन्सच्या 'पंच', दोन दिवसात दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास; पडल्या 34 विकेट

ऑस्ट्रेलिया गोलंदाजांचा कसोटी क्रिकेटमध्ये कहर! दोन दिवसात संपवला सामना
Australia beat South Africa by six wickets
Australia beat South Africa by six wickets sakal
Updated on

Australia beat South Africa 1st Test : ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेलेला पहिला कसोटी सामना दोन दिवसात संपला. 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघाने 4 गडी गमावून विजय मिळवला. या कसोटी सामन्यात एकूण 34 विकेट पडल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ 48.2 षटकांतच फलंदाजी करू शकला, तर दुसऱ्या डावात त्यांचा संघ 37.4 षटकांत 99 धावांत गारद झाला. हा कसोटी सामना गोलंदाजांसाठी कायम लक्षात राहील.

Australia beat South Africa by six wickets
FIFA WC22: 165 कोटींची किंमत; तरी वर्ल्डकप विजेत्याला मिळणार खोटी ट्रॉफी!

गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 15 विकेट पडल्या, तर दुसऱ्या दिवशीही विकेट्सचा सिलसिला सुरूच होता. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी जास्त विकेट पडल्या. यजमान संघाने दुसऱ्या दिवशी 9 विकेट गमावल्या, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या संपूर्ण 10 विकेट पडल्या. दुसऱ्या दिवशी एकूण 19 विकेट्स पडल्या. अशा स्थितीत कसोटी क्रिकेटसाठी ते योग्य आहे का, असा प्रश्न पडतो. कारण त्यात पाच दिवसांचा खेळ असतो. मात्र गाबामध्ये पूर्ण दोन दिवसही खेळ झाला नाही आणि त्याचा परिणाम तुम्हा सर्वांसमोर आहे.

Australia beat South Africa by six wickets
WTC Points Table : टीम इंडिया फायनलच्या दिशेने मात्र 'या' संघाकडून धोका; जाणून घ्या समीकरण

34 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावून पूर्ण केले. त्याने 7.5 षटकांत विजय मिळवला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा 2 धावा काढून बाद झाला, तर डेव्हिड वॉर्नरने 3 धावांचे योगदान दिले. स्टीव्ह स्मिथने 6 धावा केल्या, तर कागिसो रबाडाने पहिल्या डावात शतक हुकलेल्या ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडू दिले नाही. रबाडाने दुसऱ्या डावात चारही विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आफ्रिका संघाचा पहिला डाव 152 धावांवर आटोपला. यष्टिरक्षक काइल व्हेरिनने सर्वाधिक 64 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने 3-3 बळी घेतले. पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांच्या खात्यात दोन विकेट गेल्या.

Australia beat South Africa by six wickets
Ind vs Ban 1st Test: कुलदीप 20 महिन्यानंतर परतला अन् केली कमाल! अक्षरची लाभली साथ

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 218 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात केवळ 50.3 षटकेच फलंदाजी करू शकला. त्याच्याकडून ट्रॅव्हिस हेडने 92 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथ 36 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 4 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 99 धावांवर आटोपण्यात कांगारूंच्या कर्णधाराने महत्त्वाची भूमिका बजावली. कमिन्सने 5 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात खाया जोंडोने 36 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.