AUS vs WI 3rd T20I : रुदरफोर्ड - रस्सेलचा विक्रमी झंझावात! वेस्ट-इंडीजचा अखेरच्या लढतीत विजय; मालिकेवर मात्र ऑस्ट्रेलियाची बाजी

West Indies Beat Australia News :
West Indies Beat Australia News Marathi
West Indies Beat Australia News Marathisakal
Updated on

Australia vs West Indies 3rd T20I News : शेरफेन रुदरफोर्ड - आंद्रे रस्सेल या जोडीच्या झंझावाती व विक्रमी फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाने येथे झालेल्या अखेरच्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियन संघावर ३७ धावांनी विजय मिळवला.

रुदरफोर्डने नाबाद ६७ धावांची आणि रस्सेलने ७१ धावांची स्फोटकी खेळी साकारली. दोघांनी १३९ धावांची विक्रमी भागीदारीही रचली. ही लढत वेस्ट इंडीजने जिंकली असली तरी ऑस्ट्रेलियाने टी-२० मालिकेत २-१ अशी बाजी मारली.

West Indies Beat Australia News Marathi
Ind vs Eng 3rd Test : अश्विन-जडेजाच्या तालावर नाचणार इंग्रज? राजकोटच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट आली समोर

वेस्ट इंडीजकडून मिळालेल्या २२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारली. डेव्हिड वॉर्नर याने ४९ चेंडूंमध्ये ९ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावांची खेळी करीत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर टीम डेव्हिड याने नाबाद ४१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना मात्र यश मिळवता आले नाही.

West Indies Beat Australia News Marathi
Dattajirao Gaekwad Dies : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने घेतला जगाचा अखेरचा निरोप

त्याआधी वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे वेस्ट इंडीजची अवस्था ३ बाद १७ आणि त्यानंतर ५ बाद ७९ धावा अशी अवस्था झाली. पण रुदरफोर्ड व रस्सेल या जोडीने १३९ धावांची धडाकेबाज भागीदारी करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

रुदरफोर्ड याने पाच चौकार व पाच षटकारांसह आपली नाबाद ६७ धावांची खेळी सजवली. रस्सेल याने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ४ चौकार व सात षटकारांसह ७१ धावांची आक्रमक खेळी केली. वेस्ट इंडीजने २० षटकांत ६ बाद २२० धावा फटकावल्या.

आकडेवारीवर नजर

- ॲडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर या लढतीत ४ षटकांत ६५ धावा फटकावण्यात आल्या. ऑस्ट्रेलियाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा त्याच्याच गोलंदाजीवर काढण्यात आल्या. याआधी अँड्र्यू टे याच्या गोलंदाजीवर ६४ धावांचा पाऊस पाडण्यात आला होता. त्याचा नकोसा विक्रम झॅम्पाकडून मागे पडला.

- आंद्रे रस्सेल - शेरफेन रुदरफोर्ड यांच्यामध्ये सहाव्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी करण्यात आली. वेस्ट इंडीजसाठी सहाव्या विकेटसाठी करण्यात आलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली.

- रस्सेल - रुदरफोर्ड यांनी टी-२० क्रिकेट इतिहासातील सहाव्या विकेटसाठीही सर्वाधिक १३९ धावांची भागीदारी रचली. याआधी पीएनजी संघाच्या टॉनी युरा व नॉर्मन वानुआ या जोडीने सिंगापूरविरुद्धच्या टी-२० लढतीत ११५ धावांची भागीदारी रचली होती. या जोडीचा विक्रम रस्सेल-रुदरफोर्ड जोडीने मागे टाकला.

संक्षिप्त धावफलक ः वेस्ट इंडीज ६ बाद २२० धावा (रॉस्टन चेस ३७, रोवमॅन पॉवेल २१, शेरफेन रुदरफोर्ड नाबाद ६७ - ४० चेंडू, ५ चौकार, ५ षटकार, आंद्रे रस्सेल ७१ - २९ चेंडू, ४ चौकार, ७ षटकार, झेवियर बार्टलेट २/३७) विजयी वि. ऑस्ट्रेलिया २० षटकांत ५ बाद १८३ धावा (डेव्हिड वॉर्नर ८१ - ४९ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार, टीम डेव्हिड नाबाद ४१, रॉस्टन चेस २/१९).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.