Ind vs Aus Test Series: कांगारू दुखापतीने त्रस्त! भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन कसोटी संघ जाहीर

स्टार्क नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पण...
Australia Announce Squad For India Test Series
Australia Announce Squad For India Test Series sakal
Updated on

Australia announce squad for India Test series: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या 18 सदस्यीय संघात 22 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज टॉड मर्फीचा समावेश करण्यात आला आहे.

Australia Announce Squad For India Test Series
Ruturaj Gaikwad : ऋतुराजचा तांडव ठोकले वादळी शतक

सध्या स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांची दुखापत हा चिंतेचा विषय आहे. स्टार्क नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ग्रीन आणि स्टार्कला दुखापत झाली होती. या दोन्ही खेळाडूंच्या बोटात फ्रॅक्चर झाले होते.

Australia Announce Squad For India Test Series
IND vs SL : विराटने शतक करताच X फॅक्टर सूर्या म्हणणारा गंभीर झाला ट्रोल; भन्नाट Memes Viral

भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कांगारू संघात चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. ऑफस्पिनर टॉड मर्फीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खूप धमाल केली. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्याला संघात स्थान देण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघावर नजर टाकली तर टॉड मर्फी, अॅश्टन अगर, मिचेल स्वेपसन आणि नॅथन लायन यांचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांनी अॅडम झाम्पाविरुद्ध टॉड मर्फीला प्राधान्य देणे योग्य मानले.

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ : पॅट कमिन्स, अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.