विराट सेनेच्या पराभवानंतर ऑस्टेलियन कॅप्टनचा माफीनामा

काही वेळा आपण चुकीचे ठरतो. केन विल्यमसनच्या नेतृत्वाचे आणि संघाच्या कामगिरीचेही त्याने कौतुक केले.
Tim Paine
Tim PaineTwitter
Updated on

WTC Final WTC Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत करुन दाखवलं. विराट सेनेच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनवर (Tim Paine ) माफी मागण्याची नामुष्की ओढावली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडला सहज पराभूत करेल, अशी भविष्यवाणी टिम पेन याने केली होती. न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांनी केलेला भेदक मारा आणि मोक्याच्या क्षणी किवी कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलरने केलेली चिवट फलंदाजीने त्याची भविष्यवाणी फोल ठरवली. त्यामुळे पेनने माफी मागितली आहे. Australia Captain Tim Paine Apologise For Prediction India Beat New Zealand In World Test Championship Final)

पेन म्हणाला की, काही वेळा आपण चुकीचे ठरतो. केन विल्यमसनच्या नेतृत्वाचे आणि संघाच्या कामगिरीचेही त्याने कौतुक केले. न्यूझीलंड संघाने उत्तम खेळ केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे, असेही त्याने म्हटले आहे.

Tim Paine
WTC : पराभवानंतर ICC ने किंग कोहलीला दिला आणखी एक धक्का

क्रीडा क्षेत्रातील इतर घडामोडींसाठी येथे क्लिक करा

न्यूज टॉकमधील संवादावेळी पेन म्हणाला की, आपण सर्वच कधी कधी चुकीचे ठरत असतो. किवी चाहत्यांसोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर विनम्रपणे आपली चूक कबूल करावी वाटते. मला वाटते की न्यूझीलंडने कमालीचे क्रिकेट खेळले. त्यांनी ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ केलाय त्याचा सन्मान करायलाच हवा, असे पेनने म्हटले आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने त्यांची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली तरी टीम इंडिया सहज जिंकेल, असे पेन सामन्यापूर्वी म्हणाला होता.

Tim Paine
WTC Final मधील 5 मोठे विक्रम; अश्विनसह चौघांची हवा

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये टिम पेन आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यात वादावादीचा प्रकार चर्चेत आला होता. त्यानंतर टिम पेनने कोचचे समर्थन केल्याचेही पाहायला मिळाले होते. आम्ही सर्व टीम म्हणून एकत्र आहोत. खेळात सुधारणा करुन आम्हाला पुढे जायचे आहे. लँगरही याचा एक भाग आहेत, असे पेन टिमने म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.