Australia Defeat India In World Test Championship Final 2023 : ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव करत जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा उचलली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर चौथ्या डावात विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला आपल्या दुसऱ्या डावात 234 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सलग दुसऱ्यांदा WTC च्या फायनलमध्ये धडक मारूनही हाराकिरी केली.
जागतिक क्रिकेटमध्ये दादागिरी करणाऱ्या भारताला गेल्या 10 वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे बाय लॅटरल किंग टीम इंडिया हा आयसीसी ट्रॉफीत मात्र नवा चोकर्स ठरतो का अशी शंका निर्माण झाली आहे. भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्माला देखील आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश येत आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर चौथ्या डावात विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. चौथ्या दिवशी खेळ संपला त्यावेळी भारतीय संघ 3 बाद 164 धावांवर होता. मात्र पाच्यव्या दिवशी पहिल्या सत्रातच कांगारूंनी भारताच्या उरलेल्या सात विकेट्स घेत सामना खिशात टाकला. भारताचा दुसरा डाव 234 धावात संपुष्टात आला. कांगारूंनी 209 धावांनी सामना जिंकत WTC वर आपले नाव कोरले.
भारताकडून विराट कोहलीने 49, अजिंक्य रहाणेने 46 तर रोहित शर्माने 43 धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनने 4 तर स्कॉट बोलँडने 3 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने 2 अन् पॅट कमिन्सने 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात हेडच्या 163 आणि स्मिथच्या 121 धावांच्या जोरावर 469 धावा केल्या. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या. भारताने पहिल्या डावात खराब सुरूवातीनंतर अजिंक्य रहाणेच्या झुंजार 89 धावांची खेळीने भारताची लाज वाचली. शार्दुल ठाकूरलाने देखील 51 धावा केल्या त्यामुळे भारत दुसऱ्या डावात 296 धावांपर्यंत पोहचला.
पहिल्या डावात कांगारूंनी 173 धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात त्यांनी 270 धावांवर डाव घोषित करत भारतासमोर 444 धावांचे मोठे आव्हान ठेवले. मात्र भारताचा दुसरा डाव 234 धावांमध्ये गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.