Marcus Stoinis : स्टॉइनिसची दहशत, गोलंदाज हादरले, 10 चेंडूत ठोकल्या 52 धावा! - Video

मार्कस स्टॉइनिसने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावून एक तुफानी खेळी खेळून रचला इतिहास
Marcus Stoinis
Marcus Stoinissakal
Updated on

Marcus Stoinis Video T20 World Cup : अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने श्रीलंकेविरुद्ध झंझावाती खेळी खेळत संघाला 7 गडी राखून विजय मिळवून दिला. स्टॉइनिसने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावून एक तुफानी खेळी करून इतिहास रचला. स्टॉइनिसने 327.78 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 18 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 59 धावा केल्या. म्हणजेच त्याच्या डावातील 10 चेंडूत केवळ चौकार आणि षटकार मारल्या 52 धावा केल्या. यादरम्यान त्याने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

Marcus Stoinis
Virat Kohli: मीडिया-ट्रोलर्सने कोहलीवर खूप दबाव आणला, पण त्याने...; शास्त्रींचं विधान

टी-20 विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत स्टॉइनिस दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी नेदरलँड्सच्या स्टीफन मेइबर्गने 2014 टी-20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडविरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. पहिल्या स्थानावर भारताचा युवराज सिंग आहे, ज्याने 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत स्टॉइनिस पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलचा विक्रम मोडला. या दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियासाठी १८-१८ चेंडूत अर्धशतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

Marcus Stoinis
AUS Vs SL : एकदाची ऑस्ट्रेलिया जिंकली! स्टोयनिसने लंकेच्या फिरकीपटूंना चांगलेच चोपले

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत विजयाचे खाते उघडले आहे. श्रीलंकेच्या 157 धावांना प्रत्युत्तर देताना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने 16.3 षटकांत 3 गडी गमावून विजय मिळवला. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.