The Ashes ENG vs AUS: रोमांचक मोडवर पोहोचला सामना! शेवटचा दिवस इंग्लंडला 7 विकेट्स तर ऑस्ट्रेलियाला 174 धावांची गरज

The Ashes ENG vs AUS
The Ashes ENG vs AUS
Updated on

The Ashes England vs Australia : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना रोमांचक मोडवर आला आहे. या सामन्याच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांचे लक्ष्य आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 107 धावा केल्या आहेत.

मात्र यादरम्यान संघाने डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या विकेट्सही गमावल्या आहेत. सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला 7 विकेट्स आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 174 धावांची गरज आहे.

The Ashes ENG vs AUS
BCCI Selection Committee: टीम इंडियाच्या नव्या निवडकर्त्यांची घोषणा, 3 कसोटी अन् 5 वनडे खेळलेल्या खेळाडूवर मोठी जबाबदारी

डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाज यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. 36 धावांची इनिंग खेळल्यानंतर वॉर्नर रॉबिन्सनचा बळी ठरला. दुसऱ्या डावातही लबुशेनची बॅट शांत राहिली आणि त्याला केवळ 13 धावा करता आल्या. स्मिथच्या बॅटमधून फक्त 6 धावा आल्या. दोघेही ब्रॉडच्या चेंडूवर यष्टिरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद झाले. ख्वाजा 34 आणि नाईटवॉच मॅन स्कॉट बोलँड यष्टीमागे 13 धावांवर नाबाद आहे.

The Ashes ENG vs AUS
ODI World Cup PCB : नाचता येईना अंगण वाकडे! पाकिस्तान चेन्नई, बंगळूर खेळपट्टीवर खेळण्यासाठी घाबरला म्हणे...

इंग्लंडचा डाव 237 धावांवर आटोपला

चौथ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 273 धावांत संपुष्टात आला होता. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने 80 धावांत चार विकेट घेतल्या तर कर्णधार पॅट कमिन्सने 63 धावांत चार बळी घेतले. ओली रॉबिन्सनने 27 धावांची उपयुक्त खेळी खेळली. रॉबिन्सनने स्टुअर्ट ब्रॉडसोबत नवव्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी केली. इंग्लंडसाठी सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज जेम्स अँडरसनने संघाला 270 धावांपर्यंत नेले.

2005 मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 282 धावांची गरज होती आणि संघ दोन धावांनी हरला होता. यावेळी त्याला 281 धावांची गरज आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात आठ गडी बाद 393 धावा केल्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.