U19 World Cup 2024 : भारतासाठी ऑस्ट्रेलिया अजूनही कोडचं! वर्ल्डकप फायलनमध्ये पुन्हा केला पराभव

U19 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाने रोहित शर्मानंतर आता उदय सहारनचे देखील तोडले स्वप्न
U19 World Cup 2024
U19 World Cup 2024esakal
Updated on

U19 World Cup 2024 Final : ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारताला आयसीसी वर्ल्डकपमध्ये पराभवाचा धक्का दिला. 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने WTC फायनल वनडे वर्ल्डकपची फायनल आणि आता 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये देखील भारताला पराभूत केलं.

ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच 19 वर्षाखालील वर्ल्डकप फायलनमध्ये भारताचा पराभव केला आहे. याचबरोबर त्यांनी चौथ्यांदा 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला. भारताने 2012 आणि 2018 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला मात दिली होती.

U19 World Cup 2024
Glenn Maxwell : RCB पहिल्या IPL विजेतेपदाच्या जवळ..? रोहितची बरोबरी करणाऱ्या मॅक्सवेलने चाहत्यांच्या आशा केल्या पल्लवीत

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 254 धावांचे आव्हान पार करताना भारताचा संपूर्ण संघ 174 धावात गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून बिअर्डमन आणि मॅकमिलनने भेदक मारा केला. या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. भारताकडून सलामीवीर आदर्श सिंगने सर्वाधिक 47 धावा केल्या. मात्र या धावा करण्यासाठी त्याने 77 चेंडू देखील घेतले.

भारताकडून आदर्शव्यतिरिक्त फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. मुशीर खानने 22 तर मुर्गन अश्विनने 42 धावा केल्या. नमन तिवारीने 13 धावांची खेळी करत मुर्गनला साथ देण्याचा प्रयत्न केला. बेअर्डमन आणि मॅकमिलन यांनी प्रत्येकी 3 तर वाईल्डरने 2 विकेट्स घेतल्या.

U19 World Cup 2024
U19 World Cup 2024 Final : संपूर्ण स्पर्धेत फेल गेलेल्या हरजास सिंगचे फायनलमध्ये अर्धशतक, भारताला रचावा लागणार इतिहास

तत्पूर्वी, 19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 50 षटकात 7 बाद 253 धावा करत भारतासमोर मोठे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून हरजास सिंगने सर्वाधिक 55 धावा केल्या. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 तर नयन तिवारीने 2 विकेट्स घेतल्या.

आतापर्यंत 19 वर्षाखालील वर्ल्डकप फायनलमध्ये 253 धावांचे आव्हान कोणी पार केलेलं नाही. यापूर्वी 1998 मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडविरूद्ध 242 धावा चेस केल्या होत्या. भारताला आता इतिहास रचण्याची संधी आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.