Ashes Test Day 3 : तिसऱ्या दिवसाअखेर कांगारुंकडे मोठी आघाडी

Ashes 2nd Test Day 3
Ashes 2nd Test Day 3 Sakal
Updated on

अ‍ॅडलेड : Australia vs England, 2nd Test Day 3 : अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडच्या संघ बॅकफूटवर आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव 236 धावांत आटोपून ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केलीये. तिसऱ्या दिवसाअखेर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) रुपात एक विकेट गमावून ऑस्ट्रेलिया संघाने 45 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर 38 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 13 धावांची भर घालून चालता झाला. ब्रॉड आणि जोस बटलरनं मिळून वॉर्नरला धावबाद केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मार्कस हॅरिस (Marcus Harris) 21 (59) आणि मायकल नेसेर (Michael Nese) 2(6) धावांवर नाबाद खेळत होते. ऑस्ट्रेलियाने 282 धावांची आघाडी घेतली होती.

अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 2 बाद 17 धांवांवरुन खेळाला सुरुवात केली. पण त्यांचा डाव 236 धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने (Mitchell Starc) भेदक मारा करत 37 धावा खर्च करुन इंग्लंडच्या 4 गड्यांना तंबूत धाडले. दुसऱ्या बाजूनं नॅथन लायननने त्याला 3 विकेट घेऊन उत्तम साथ दिल्याचे पाहायला मिळाले.

Ashes 2nd Test Day 3
Ashes : बटलर पहिल्या सत्रात हिरो शेवटच्या सत्रात झिरो (Video)

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि कर्णधार जो रुट (Joe Root) यांनी कांगारुंच्या भेदक माऱ्याचा उत्तमरित्या सामना करत तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. जो रुट 62 आणि डेव्हिड मलान 80 धावा करुन बाद झाल्यानंतर मात्र इंग्लंडचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. इंग्लंडच्या सात गड्यांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 237 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पाहुण्या इंग्लंडला फॉलोऑन न देता ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. चौथ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारून मालिकेत 2-0 आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. (Australia vs England)

Ashes 2nd Test Day 3
Ashes : स्टार्कच्या माऱ्यासमोर इंग्लंडचे शेर झाले ढेर

दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 9 बाद 473 धावांवर डाव घोषीत केला होता. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 167 चेंडूत 95 धावांची खेळी केली होती. त्याच्या शतक अवघ्या 5 धावांनी हुकले होते. लाबुशेने याने 305 चेंडूत 103, कर्णधार स्टिव्ह स्मिथनं 201 चेंडूत केलेल्या 93 धावा आणि एलेक्स कॅरीचे अर्धशतक ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर ठरले. या चौघडीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेणं शक्य झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.