Australia vs Pakistan Test : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. गुरुवारी या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियावर चांगली पकड मिळावली. या सामन्यात दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. (Cricket News in Marathi)
मात्र, या सामन्यात तिसर्या दिवशी उपाहारानंतर असे काही घडले की खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. आणि याची कोणालाच अपेक्षा नव्हती. झालं असे की, तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि मैदानावरील पंच मैदानात आले होते. मात्र, मैदानात आल्यानंतरही खेळ सुरू होऊ शकला नाही. कारण थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले होते. (Cricket News in Marathi)
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या. मार्नस लॅबुशेनने 63, उस्मान ख्वाजाने 42 आणि मिचेल मार्शने 41 धावा केल्या. याशिवाय डेव्हिड वॉर्नरने 38 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून आमिर जमालने तीन बळी घेतले. तर शाहीन आफ्रिदी, मीर हमजा आणि हसन अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात दमदार सुरुवात करणारा पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 264 धावांत गारद झाला. पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर 124 धावा होती आणि त्यानंतर संघाने 140 धावा करताना पुढचे नऊ विकेट पडल्या. तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा डाव 264 धावांवर आटोपला.
पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीकने 62 धावा, कर्णधार शान मसूदने 54 धावा, मोहम्मद रिझवानने 42 आणि शाहीन आफ्रिदीने 21 धावा केल्या. तर आमिर जमाल 33 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने पाच आणि नॅथन लायनने चार विकेट घेतल्या. सध्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.