Women's Cricket World Cup Final : न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंड महिला संघाला (England Women) पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियन महिला संघाने (Australia Women) दिमाखदार विजयाची नोंद करत वर्ल्ड कपच्या इतिहासात सातव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 350 + धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून नॅटली स्कीव्हरने (Natalie Sciver) 148 धावा करत एकाकी झुंज दिली. ती शेवटपर्यंत नाबाद राहिली. इंग्लंडचा संघ 43.4 षटकात 285 धावांतच आटोपला.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंड महिला संघाला सुरुवातीच्या तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवाच्या हॅटट्रिकची नामुष्की ओढावल्यानंतर त्यांनी दमदार कमबॅक करत फायनल गाठली. पण स्पर्धेतील अपराजित ऑस्ट्रेलियन महिला संघाने त्यांना रोखून दाखवत आपल्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या विक्रमात सुधारणा केली. वर्ल्ड कप गमावल्यानंतर संघाच्या ताफ्यात निराशेच वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले. काटे क्रॉस (Kate Cross) आपल्या संघातील टिममेट कॅथरिन ब्रुंट हिला (Katherine Brunt ) मिठीत घेऊन दिलासा देताना दिसली. हा क्षण 2017 मध्ये भारतीय संघावर (India Women) ओढावलेल्या पराभवाच्या क्षणाची आठवण करुन देणारा असाच होता.
इंग्लंडच्या ताफ्यातील क्षण 2017 च्या आठवणी जागवणारा
इंग्लंडमध्ये 2017 मध्ये झालेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाने सेमी फायनलमध्ये तगड्या ऑस्ट्रेलियन संघाला नमवून फायनल गाठली होती. लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी भारतीय महिला संघाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोत झुलन गोस्वामी संघातील आपल्या सहकाऱ्याच्या खांद्यावर डोक टेकून हताश झाल्याचे पाहायला मिळाले होते. संघातील इतर खेळाडूंची अवस्थाही अगदी तशीच होती. अगदी तिच वेळ आता इंग्लंड महिला संघावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.