BCCI च्या 'या' निर्णयावर ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू नाराज

टीम इंडियाच्या या खराब कामगिरीनंतर ऋषभ पंतच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
Australian Brad Hogg unhappy BCCI decision
Australian Brad Hogg unhappy BCCI decision
Updated on

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाची अवस्था सध्या वाईट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून सलग दोन टी-20 सामन्यांत टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाच्या या खराब कामगिरीनंतर ऋषभ पंतच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती, त्यानंतर केएल राहुलला कर्णधारपद सोपवण्यात आली होती, मात्र केएल राहुल मालिका सुरू होण्यापूर्वीच दुखापत झाली होती. केएल राहुल संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत ऋषभ पंत फ्लॉप ठरला आहे. (Australian Brad Hogg unhappy BCCI decision)

Australian Brad Hogg unhappy BCCI decision
BCCI ची मोठी घोषणा, माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या पेन्शनमध्ये वाढ

बीसीसीआयच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू ब्रॅड हॉग (Brad Hogg) खूप नाराज आहेत. ऋषभ पंतच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा कर्णधार बनवायचे होते, असे ब्रॅड हॉगचे मत आहे. हार्दिक पांड्याने नुकताच गुजरात टायटन्‍सला IPL 2022 ची ट्रॉफी जिंकून दिली आहे.

ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॉग म्हणाला, केएल राहुलनंतर हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत कर्णधार व्हायला हवा होता. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. कठीण परिस्थितीत तो चांगली कामगिरी करतो. प्रतिकूल परिस्थितीत पाहता हार्दिक पांड्या बॅट असो वा चेंडू चांगली कामगिरी करत आहे.

Australian Brad Hogg unhappy BCCI decision
Ind Vs Sa : भारतीय संघावर आता मालिका गमावण्याचे संकट

जागतिक क्रिकेटमधील सर्वात मौल्यवान टी-20 क्रिकेटर सध्या हार्दिक पांड्या आहे. पहिल्या टी-20 सामन्यामध्ये पांड्या शेवटच्या षटकात फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूपासून चौकार मारून डावाला सुरुवात केली. टीम इंडियाने सुरुवातीलाच विकेट गमावल्या तर हार्दिक पांड्या वर जाऊन डाव सांभाळू शकतो, असे ब्रॅड हॉग म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.