भारतातील आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी चांगलीच धगधग करावी लागली. मालदीवमध्ये काही दिवसांचा मुक्काम तेथील क्वारंटाईन संपल्यानंतर 38 खेळाडू मायदेशी परतले. ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर या खेळाडूंना क्वारंटाईनच्या प्रक्रियेतून जावे लागले. ऑस्ट्रेलियन खेळाडू तेथील क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करुन आपापल्या घरी पतले आहेत. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सला (Pat Cummins) घरी नेण्यासाठी त्याची पत्नी क्वारंटाईन सेंटरच्या बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. क्वांरटाईन सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर पॅटही चांगलाच भावूक झाला. त्याने बेकी बोस्टनची कडकडून गळाभेट घेतली. ऑस्ट्रेलियन क्रीडा पत्रकार अमांडा बेली यांनी या दोघांचा एक व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलाय. (Australian Cricketer Pat Cummins Emotional After Meeting Pregnant Partner Beky Boston)
बेलीने व्हिडिओला एक खास कॅप्शनही दिले आहे. दिवसातील खास व्हिडिओ असे त्यांनी या व्हिडिओचे वर्णन केले आहे. आयपीएलसाठी पॅट कमिन्स आठ आठवड्यांपेक्षा अधिककाळ घराबाहेर होता. तो आयपीएलसाठी बाहेर होता त्याच वेळी त्याची गर्लफ्रेंड बेकी बोस्टन हिने प्रेग्नंट असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर पॅट कमिन्सने तिला भेटण्यासाठी आतूर असल्याचे प्रतिक्रियाही दिली होती. गोड बातमी समजल्यानंतर प्रत्येक्षात आपल्या प्रेग्नंट गर्लफ्रेंडला भेटल्यानंतर तो भावूक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर आता हे स्वीट कपल नव्या अलिशान घरामध्ये शिफ्ट झाले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार त्यांचे नव्या घराची किंत 70 कोटी इतकी आहे. बेकीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा फोटो शेअर केलाय. बेबी बंपचा फोटोसह तिने नव्या घरात प्रवेश केल्याचे म्हटले आहे.
कमिन्सशिवाय ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरक, माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल ही मंडळी देखील क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करुन आपापल्या घरी परतली आहे. वॉर्नरने सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.