India vs Australia Final : पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान देखील फायनलसाठी राहणार उपस्थित

India vs Australia Final
India vs Australia Final esakal
Updated on

India vs Australia Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप सामन्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मारलेस उपस्थित राहणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातचे मुख्यमंत्र भुपेंद्र पटेल यांनी आज गांधीनगर येथे उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बैठकीत सामन्यादरम्यानच्या सुरक्षेबाबत इतर व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मारलेस हे दोघेही फायनल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री पटेल यांनी सुरक्षा आणि इतर व्यवस्थेबाबतची माहिती या बैठकीत घेतली.'

India vs Australia Final
Suryakumar Yadav : सूर्या होणार भारतीय संघाचा कर्णधार; संघ व्यवस्थापन प्लॅन बदलणार?

पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये मुख्यमंत्र्यांनी सामन्याचे व्यवस्थित आयोजन करण्याबाबत काही सुचना केल्या आहेत. त्यांना सुरक्षेसंदर्भातील माहिती देण्यात आली. सामन्यासाठी 4,500 कर्मचारी मैदानात तैनात करण्यात येणार आहेत. ते संघ, व्हीआयपी यांना सुरक्षा पुरतवतील आणि ट्रॅफिकचे व्यवस्थापन करतील.

मुख्यमंत्र्यांनी व्हीआयपी व्यक्तींची ये-जा होत असताना सामन्य लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची सुचना केली आहे. कोणते रस्ते बंद असतील आणि कुठे कुठे वाहतूक वळवण्यात आली आहे याची लोकांना आधीच माहिती द्या असेही सांगितले आहे.

India vs Australia Final
IND vs AUS : सरावावेळी रोहित शर्माने खेळपट्टीबाबत दिली हिंट; द्रविडसोबत केली दीर्घ चर्चा

याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी मोटेरा स्टेशनकडील मेट्रोच्या फेऱ्या देखील वाढवण्याची सुचना केली आहे. क्रिकेट चाहते देशभरातूनच नाही तर जगभरातून शहरात येणार आहेत.

भारतीय संघ गुरूवारी संध्याकाळीच अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आज शुक्रवारी अहमदाबादमध्ये पोहचला आहे. भारतीय संघाने आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव केला.

दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स टीमने सांगता समारंभाची रंगीत तालमी केली. रविवारी सामन्यादरम्यान एअर शो होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.