अखेर जोकोविच आउट; नदाल 'बिग थ्री'ची अब्रू राखणार?

Australian Open 2022
Australian Open 2022Sakal
Updated on

वर्षाची पहिली वहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा (Grand Slam) असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) टेनिस जगतातील अव्वल आणि सर्बियाचा स्टार नोवाक जोकोविचची (Novak Djokovic) जादू दिसणार नाही. लसीकरणाच्या वादात जोकोविचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने दुसऱ्यांदा रद्द केला होता. पहिल्यांदा न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळाला. पण दुसऱ्यावेळी न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आणि तो स्पर्धेतून बाद झाला. टेनिस जगतातील 'बिग थ्री' रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यातील आता दोन दिग्गज ऑस्ट्रेलियन ओपनच्या यंदाच्या हंगामात खेळणार नाहीत. त्यामुळे 'बिग थ्री'च्या वर्चस्वाचा दबदबा कायम राखण्याची जबाबदारी आता राफेल नदालवर असेल.

ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open 2022) स्पर्धेत 'बिग थ्री'च्या पर्वाची सुरुवातही स्वित्झर्लंड स्टार रॉजर फेडरर (Roger Federer) याने केली होती. त्याने 2004 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. त्याने अंतिम फेरीत रशियाच्या मराट साफिनला पराभूत केले होते. त्यानंतर फेडररने 2006, 2007, 2010, 2017 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.

Australian Open 2022
India Open 2022 : भारतीय जोडगोळीनं पटकावलं विक्रमी जेतेपद

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचची हवा!

'बिग थ्री'मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे नाव आहे ते नोवाक जोकोविचचं (Novak Djokovic). त्याने 2008 मध्ये फ्रान्सच्या जो-वेलफ्रेड सोंगाला नमवत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020 आणि 2021 या वर्षी जोकोविचने ही स्पर्धा जिंकली. सर्वाधिक नऊ वेळा जोकोविचनं ही स्पर्धा जिंकली आहे. यंदा कोरोना लसीकरणाच्या वादामुळे तो स्पर्धेला मुकणार आहे.

Australian Open 2022
तू, मी आणि एमएस...अनुष्कानं सांगितली कोहलीच्या कॅप्टन्सीची अनटोल्ड स्टोरी

2009 पासून नदाल जेतेपदाच्या प्रतिक्षेत

राफेल नदालनं (Rafael Nadal) 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. त्याने फायनलमध्ये फेडररला नवलं होतं. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नदालचा प्रयत्न सातत्याने अपूरा पडलाय. ही प्रतिक्षा संपुष्टा आणत 'बिग थ्री'चे ग्रँडस्लॅममधील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान आता नदालसमोर असेल.

जर नदालनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली तर...

फेडरर, जोकोविच आणि नदाल या तिघांनी 20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. जर नदालने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली तर त्याच्या नावे सर्वाधिकवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रमाची नोंद होईल. नदाल विश्वविक्रमाला गवसणी घालणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा दावेदाराच्या शर्यतीत कोण कोण?

नोवाक जोकोविचच्या अनुपस्थितीत रशियाचा डॅनिल मेदवेदेव यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे. सध्याच्या घडीला तो टेनस क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. मागील वर्षी त्याने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह, ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास, रशियाचा आंद्रे रूबलेव आणि नदाल ही मंडळी जेतेपदाच्या शर्यतीत असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.