Australian Open Sumit Nagal : भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलने यंदांच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने फक्त पात्रता फेरी पार केली नाही तर पहिला राऊंड देखील जिंकला होता. मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये चीनच्या शँगने त्याचा चार सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात 6-2, 3-6, 5-7, 4-6 असे पराभूत केले.
नागल जर पराभूत झाला असला तरी त्याच्या झुंजार खेळीने चाहत्यांचे मन जिंकले. नागलने काही दिवसांपूर्वी आपल्याकडे सरावासाठी फार पैसे नसल्याची पोस्ट केली होती. त्याच्या खात्यात एक लाख रूपये देखील शिल्लक नसल्याचे त्याने सांगितले होते. आता नागलने ऑस्ट्रेलिया ओपनच्या दुसऱ्या फेरीपर्यंत धडक मारली. त्यामुळे त्याला जवळपास 180,000 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 98 लाख रूपये मिळणार आहेत.
शँगविरूद्धच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सुमित नागलने दमदार सुरूवात करत पहिला सेट 40 मिनिटात जिंकला होता. मात्र त्यानंतर चीनच्या 18 वर्षाच्या शँगने जोरदार पुनरागमन केलं. त्याने दुसरा सेट आरामात जिंकला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये सुमितने झुंजार खेळ करत शँगला चांगलेच आव्हान दिले. मात्र शँगने तिसरा सेट 7 - 5 असा जिंकला अन् चौथा सेट 4-6 असा नावावर करत सामना जिंकला. हा सामना 2 तास 50 मिनिटे चालला.
सुमितने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत अलेक्झांडर बुब्लिकचा सरळ सेटमध्ये विजय मिळवून इतिहास रचला. नागलने 27 व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा 6-4, 6-2, 7-6(5) असा पराभव केला होता. यासह, 1989 मध्ये रमेश कृष्णननंतर एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये सीडेड खेळाडूला पराभूत करणारा तो पहिला भारतीय टेनिसपटू ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.