Rohan Bopanna : वयाच्या 43 व्या वर्षी नंबर वन! सेमी फायनलमध्ये एंट्री करताना बोपण्णाने मोडला हा विक्रम

Rohan Bopanna
Rohan Bopannaesakal
Updated on

Rohan Bopanna Record In Australian Open : भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णाने बुधवारी (24 जानेवारी) इतिहास रचला. त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसह त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरी गाठली. या दोघांनी मिळून पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी या जोडीचा पराभव केला.

रोहन आणि एबडेन यांनी अर्जेंटिनाच्या जोडीचा 6-4, 7-6 (7-5) अशा फरकाने पराभव केला. याचबरोबर रोहन बोपन्ना हा पुरूष दुहेरी टेनिसच्या इतिहासातील वर्ल्ड नंबर 1 होणारा सर्वात जास्त वयाचा खेळाडू बनला आहे. रोहि बोपन्ना सध्या 43 वर्षाचा आहे.

Rohan Bopanna
Ind vs Eng : पहिल्या कसोटीत कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी, जाणून घ्या कशी असेल भारताची playing-11?

भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्नाने वयाच्या 43 व्या वर्षी ऑस्ट्रेलिया ओपनच्या शेवटापर्यंत रँकिंगमध्ये वर्ल्ड नंबर 1 होईल. बोपन्नाचा सर्वात यशस्वी पार्टनर असलेला मॅथ्यूज एब्डेन पुरूष दुहेरीच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. मॅथ्यूज हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.

एब्डेन आणि बोपन्नाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या 1 तास 46 मिनिट चाललेल्या क्वार्टर फायनल सामन्यात सहाव्या मानांकित मॅक्सिमो गोंजालेज आणि आंद्रेस मोल्टेनी या अर्जेंटिनाच्या जोडीचा 6-4, 7-6 (5) असा पराभव केला.

आता सेमी फायनलमध्ये पोबन्ना आणि एब्डेज यांचा सामना थॉमस मचाक आणि झिजेन झांग यांच्यासोबत होणार आहे. थॉमस हा चेक प्रजासत्ताकचा तर झांग हा चीनचा खेळाडू आहे.

बोपन्नाने राजीव राम यांचा मोडला विक्रम

बोपन्नापूर्वी अमेरिकेच्या राजीव राम यांने पुरूष दुहेरी आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये सर्वात वयस्कर नंबर वन खेळाडू होण्याचा मान पटकावला होता. त्यांने ऑक्टोबर 2022 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी हा विक्रम केला होता.

दरम्यान, रोहन बोपन्नाने 2013 मध्ये पहिल्यांदा आपली सर्वोच्च रँकिंग मिळवली होती. तो त्यावेळी वर्ल्ड नंबर 3 बनला होता. रोहन आता लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर जागतिक दुहेरी टेनिस स्पर्धेत वर्ल्ड नंबर 1रँकिंग मिळवणारा चौथा टेनिसपटू ठरला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.