Ashes Series 2023 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे कुटुंबीय धोक्यात... संघाने एकमुखाने केली विशेष मागणी

Ashes Series 2023 Controversy
Ashes Series 2023 Controversy esakal
Updated on

Ashes Series 2023 Controversy : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका 2023 मधील तिसरा कसोटी सामना हा उद्या (दि. 05 जुलै) रोजी लीड्स येथे सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने गेले दोन कसोटी सामने जिंकून मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे. लॉर्डवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 43 धावांनी विजय मिळवून दिला.

या कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोला ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर एलेक्स कॅरीने धावबाद केले. यानंतर हा खेळ भावनेचा अनादर असल्याची ओरड इंग्लंडचे चाहते आणि खेळाडू करू लागले होते. या विषयावरून दोन्ही देशातील माध्यमं आणि पंतप्रधान देखील भिडले होते.

Ashes Series 2023 Controversy
ICC Test Rankings : न खेळता ऋषभ पंतचा जलवा! रोहित शर्मा अन् विराट कोहली पडले खूप मागे

या सर्व पार्श्वभूमीवर उद्यापासून हेडिंग्लेवर तिसरी कसोटी सुरू होत आहे. ही कसोटी सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने एक मोठी मागणी केली आहे. त्यांनी आमच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 'ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने त्यांच्या कुटुंबियांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. ही मागणी एका स्टाफ मेंबरच्या 11 वर्षाच्या मुलाला लॉर्ड्सवरील काही क्रिकेट प्रेक्षकांनी अपमानित करून रडवले. तर एका खेळाडूच्या आईला लॉर्ड्स मैदान सोडण्यास भाग पाडल्यानंतर करण्यात आली आहे.'

या वृत्तात दावा केला आहे की ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या आईला लॉर्ड्स मैदान सोडण्यास प्रेक्षकांनी भाग पाडले. या प्रेक्षकांना त्यावेळी त्या स्टीव्हच्या आई आहेत हे माहिती नव्हते. मात्र त्यांना त्या ऑस्ट्रेलियन असल्याचे माहिती होते.

Ashes Series 2023 Controversy
Ravichandran Ashwin : बेअरस्टो - कॅरी वाद! अश्विननं एक वेगळाच अँगल आणला समोर, म्हणतो...

यापूर्वी लॉर्ड्स लाँग रूममध्ये उस्मान ख्वाजाला काही एमसीसी सदस्यांनी अपशब्द वापरले होते. यावेळी उस्मान ख्वाजाची या सदस्यांसोबत वादावादी देखील झाली होती. अखेर एमसीसीने अपशब्द वापरणाऱ्या तीन सदस्यांना निलंबित केले आहे. या सर्व पार्शभूमीवर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीसाठी सामन्य पद्धतीने सराव केला.

जर ऑस्ट्रेलियाने लीड्सवरील तिसरी कसोटी जिंकली तर पॅट कमिन्स हा 22 वर्षात इंग्लंडमध्ये जाऊन अॅशेस जिंकणारा पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.