विराटच्या 'या' निर्णयाचा मला धक्काच बसला : पाँटिंग

विराट कोहलीने नेतृत्व सोडल्यानंतर रिकी पाँटिंग गेला फ्लॅशबॅकमध्ये
Ricky Ponting and Virat Kohli
Ricky Ponting and Virat Kohli sakal
Updated on

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने T-20 संघाचे कर्णधारपद सोडले. मात्र त्याची एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा नव्हती मात्र बीसीसीआयने त्याला हटवून रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले. त्यानंतर विराट कोहलीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले. यानंतर क्रिकेट वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. अनेक आजी माजी खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिली. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विराटच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

पाँटिंग जागतिक क्रिकेटमधील सर्वात हुशार क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. पाँटिंगने आयपीएल 2021 च्या सुरुवातीच्या वेळी कोहलीशी झालेल्या संभाषणाविषयी सांगितले. जिथे कोहलीने पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद सोडण्याबद्दल आपले विचार बोलून दाखवले होते. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करत असल्याचा त्याला अभिमान होता.

Ricky Ponting and Virat Kohli
भज्जी म्हणतो; वशीलेबाजीवर मिळते टीम इंडियाची कॅप्टन्सी

पाँटिंग म्हणाला, 'होय, हे प्रत्यक्षात घडले (मला आश्चर्य वाटले). कदाचित याचे मुख्य कारण म्हणजे, आयपीएलच्या पहिल्या भागादरम्यान (2021) पुढे ढकलण्यापूर्वी मी विराटशी गप्पा मारल्या होत्या. तेव्हा तो नेतृत्व सोडण्याबाबत बोलत होता. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून (कर्णधारपदापासून) दूर आणि कसोटी सामन्याचा कर्णधार म्हणून पुढे जाण्यासाठी तो किती उत्कट होता. त्याला ते काम आणि ते पद खूप आवडले. त्याची तो कदर करायचा. साहजिकच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने बरेच काही साध्य केले होते. जेव्हा मी विराटने कसोटीचे नेतृत्वही सोडले हे ऐकले, तेव्हा मला खरोखरच आश्चर्य वाटले," पाँटिंग 'द आयसीसी रिव्ह्यू'च्या पहिल्या भागात बोलत होता.

Ricky Ponting and Virat Kohli
माणुसकी! स्टार क्रिकेटर सराव करताना हेलिकॉप्टर उतरलं मैदानात अन्...

टीम इंडियाने कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटीत नवीन उंची गाठली आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोन मालिका विजय तसेच घराबाहेर इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजयाचा समावेश आहे. विराटची आकडेवारी त्याच्या कामगिरीची साक्ष देते. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 68 पैकी 40 कसोटी जिंकल्या. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 24 पैकी केवळ 5 मालिका गमावल्या आहेत. कोहलीने ज्या उत्कटतेने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या संघाचे नेतृत्व केले त्याबद्दल पाँटिंगने त्याचे कौतुक केले.

Ricky Ponting and Virat Kohli
U-19 World Cup : विश्वचषकात पाकिस्ताननं बांगलादेशला चारली धूळ

पाँटिंग म्हणाला "त्याला फक्त एक तास मैदानावर खेळताना बघा. तुम्हाला त्याची खेळाप्रती आणि त्याच्या भुमिकेप्रती असलेली उत्कठता दिसून येईल. त्याने नेतृत्व सोडल्यानंतर मला धक्का बसला, पण नंतर मी इतर गोष्टींबद्दल विचार करू लागलो, अगदी कर्णधार म्हणून माझा स्वतःचा काळ आठवला मी ऑन रेकॉर्ड सांगतो की मला असे वाटते की मी दोन वर्षे जास्त खेळलो. मला वाटते की मी कदाचित अपेक्षेपेक्षा दोन वर्षे जास्त काळ कर्णधार होतो.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.