Queensland Police AUS vs SA 1st Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी आजपासून ब्रिसबेन येथील गाबा स्टेडियमवर सुरू झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघातील खेळाडू काळ्या पट्ट्या घालून मैदानात उतरले. हा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी क्वीन्सलँड पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली यावेळी संपूर्ण स्टेडियम उभे राहिले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर भावूक झाले.
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 152 धावात गुंडाळले. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाची देखील आफ्रिकेने दिवस अखेर 5 बाद 145 धावा अशी अवस्था केली. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी क्वीन्सलँड पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. काही मिनिटांसाठी स्टेडियमवर स्तब्धता पाळण्यात आली. या आठवड्याच्या सुरूवातीला नाकाबंदीवेळी दोन पोलिस अधिकाऱ्यांसह 3 लोकांचा मृत्यू झाला होता.
नाकाबंदीवेळी झालेल्या गोळीबारात क्वीन्सलँड पोलीस दलातील रिचेल मॅक्रो आणि मॅथ्यू अर्नोल्ड यांचा मृत्यू झाला. या दोन्ही अधिकाऱ्यांना क्वीन्सलँड पोलीस आणि खेळाडूंनी गाबा स्टेडियमवर श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्मिथ आणि वॉर्नर दोघेही खूप भावूक झाले होते. या दोघांचे नंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे झाले.
गाबा स्टेडियममध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांनी क्वीन्सलँड पोलिसांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्यानंतर स्टेडियममधील प्रत्येकाने दोन मिनिटासाठी मैन बाळगले. गेल्या आठवड्याच्या सुरूवातीली क्वीन्सलँडमधील वेस्टर्न डाऊंस येथील एका घराला 4 पोलिसांनी घेराव घातला होता. फरारी आरोपीची चौकशी करत असताना घरातील गुन्हेगारांनी पोलिसांवर गोळबार केला. त्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत गेल्या रात्री या 3 गुन्हेगारांना ठार केले.
हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.