बीडच्या अविनाशने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडला

बीडच्या अविनाशने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडला
Updated on

राबत (मोरक्को) : भारताचा 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) प्रतिष्ठेच्या डायमंड लीग मीटमध्ये पाचव्या स्थानावर राहिला. याचबरोबर त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमधील (3000 Meter Steeplechase) राष्ट्रीय विक्रम (National Record तब्बल आठव्यांदा मोडला.

इंडियन आर्मीच्या (Indian Army Men) या 27 वर्षाच्या जवान बीड (Beed) जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील अविनाशने रविवारी रात्री झालेल्या स्पर्धेत 8.12.48 इतकी वेळ नोंदवली. त्याने आपल्या गेल्या वेळच्या सर्वोत्तम वेळेपेक्षा तीन सेकंद कमी वेळ नोंदवली. त्याने मार्चमध्ये झालेल्या इंडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 8.16.21 इतकी वेळ नोंदवली होती.

बीडच्या अविनाशने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडला
उमरान मलिक शोएबचा विक्रम मोडण्याबाबत म्हणाला..

अविनाश साबळेने या स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या केनियाच्या बेंजामिन किगेनला मागे टाकले. त्याला 8.17.32 वेळ नोंदवत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मोरक्कोच्या सौफियान एल बक्कालीने विक्रमी 7.58.28 इतकी वेळ नोंदवत डायमंड लीग मीटमध्ये देखील पहिला क्रमांक पटकावला.

तर टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता इथोपियाचा लामेचा गिरमा 7.59.24 वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन कॉन्सेसलुस किप्रुतो 8.12.47 वेळ नोंदवत चौथ्या स्थानावर राहिला. तो अविनाश साबळेपेक्षा एक मिली सेकंद पुढे राहिला.

बीडच्या अविनाशने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडला
एका वर्षात दोनदा रंगणार IPL चा थरार, फॉरमॅटदेखील तयार?

अविनाश साबळेची स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडणारा अशी ओळख निर्माण झाली आहे. त्याने 2018 मध्ये पहिल्यांदा 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत 8.29.80 इतकी वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम मोडला होता. त्याने गोपाल सौनींचा 37 वर्षे जुना 8.30.88 वेळेचा बेंचमार्क मोडीत काढला होता. गेल्या महिन्यात साबळेने 5000 मीटर स्टीपल चेसमधील 30 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम अमेरिकेतील स्पर्धेत मोडला. त्याने त्यावेळी 13.25.65 इतकी वेळ नोदंवली होती. यापूर्वी हे रेकॉर्ड बहादूर प्रसाद यांच्या नावावर होते. त्यांनी 1992 मध्ये 13.29.70 इतकी वेळ नोंदवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.