Avinash Sable : अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम; ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये गाठले पाचवे स्थान

नीरज चोप्रा आणि श्रीशंकर मुरलीनंतर अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला तो तिसरा भारतीय ॲथलिट ठरला.
avinash sable national record reached 5th place in 3000 steeplechases
avinash sable national record reached 5th place in 3000 steeplechasessakal
Updated on

नवी दिल्ली : जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेतील अपयश मागे सोडताना भारताच्या अविनाश साबळेने चीनमधील झिमेन डायमंड लीग स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत पाचवे स्थान मिळविले आणि युजिन येथे १६ व १७ तारखेला होणाऱ्या अंतिम फेरीसाठी स्थान निश्चित केले. नीरज चोप्रा आणि श्रीशंकर मुरलीनंतर अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला तो तिसरा भारतीय ॲथलिट ठरला.

बुडापेस्ट येथे जागतिक स्पर्धेत प्राथमिक फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या अविनाशने झिमेन येथे ८ मिनीटे १६.२७ सेकंदाची वेळ देत पाचवे स्थान मिळविले. यामुळे त्याचे एकूण ११ गुण झाले. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांत तो सहाव्या स्थानावर आहे.

ही शर्यती मोरोक्कोचा ऑलिंपिक व विश्वविजेता अल बकालीने याने जिंकली. दरम्यान तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेल व अब्दुला अबुबकर यांना मात्र अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. झिमेन येथे प्रवीणने १६.४२ मीटर या सर्वोत्तम कामगिरीसह पाचवे तर अब्दुला अबुबकरने १६.२५ मीटरसह सहावे स्थान मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.