Asian Games 2023 : अविनाश साबळेची स्टीपल चेसमध्ये रूपेरी कामगिरी

Asian Games 2023 Avinash Sable
Asian Games 2023 Avinash Sable esakal
Updated on

Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 मध्ये आज भारताच्या अविनाश साबळेने 5000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. अविनाशने 13 : 21.09 अशी वेळ नोंदवत रौप्य पदकावर कब्जा केला. हे त्याचे एशियन गेम्समधील दुसरे पदक आहे.

Asian Games 2023 Avinash Sable
Neeraj Chopra : हंगामातील सर्वोत्तम फेकीने नीरजनं जिंकलं गोल्ड! सिल्वर जिंकणाऱ्या किशोरनं वाढवलं होतं टेन्शन

भारताने आज एशियन गेम्समध्ये ट्रॅक अँड फिल्डमध्ये पदकांचा रतीबच लावला आहे. भारतीय महिला 4 बाय 400 रिले प्रकारात रौप्य पदक जिंकले. या संघात ऐश्वर्या मिश्रा, सुभा वेंकटेसन, प्राची आणि विथ्या रामराज यांचा समावेश होता. त्यानंतर पुरूषांनी 4 बाय 400 रिले प्रकारात मोहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल, राजेश रमेश यांनी भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले. गेल्या एशियन गेम्समध्ये पुरूष रिले संघाने रौप्य पदक पटकावले होते.

Asian Games 2023 Avinash Sable
Cheating in Asian Games : चीनचा 'रडीचा डाव', नीरज चोप्रासोबत केली चिटींग; पहिल्या थ्रोला नेमकं काय घडलं?

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताची सुवर्ण झळाळी अजून वाढवली. त्याच्या जोडीला किशोर कुमार जेनाने देखील रूपेरी कामगिरी करत भारताची पदकसंख्या 80 पार पोहचवली.

यापूर्वी भारताची बॉक्सर लवलिना बोरगोहेनने 75 किलो वजनी गटात रौप्य तर परवीन हुड्डाने कांस्य पदक पटकावले. कुस्तीत देखील भारताने पदकांच खातं उघडलं. सुनिल कुमारने ग्रिको रोमन 87 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.