IND vs SL : अक्षर - मावी शेवटपर्यंत झुंजले मात्र लंकेचा कर्णधार आला विजयाचा आडवा

 Axar Patel Shivam Mavi Sri Lanka Captain Shanaka
Axar Patel Shivam Mavi Sri Lanka Captain Shanaka esakal
Updated on

India Vs Sri Lanka 2nd T20 : भारत आणि विजय यांच्यात आजच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानका हा काळ बनून उभा राहिला. शानकाने फलंदाजी करताना शेवटच्या षटकात 21 धावा चोपल्या तर भारताला विजयासाठी 21 धावांची गरज असताना त्याने शेवटचे षटक टाकत फक्त 4 धावा देत सामना जिंकून दिला. श्रीलंकेने भारतात 2016 नंतर पहिल्यांदाच टी 20 मध्ये विजय मिळवला आहे.

भारताकडून अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावांची, मावीने 15 चेंडूत 26 धावांची तर सूर्यकुमार यादवने 51 धावांची झुंजार खेळी करत शेवटपर्यंत किल्ला लढवला.

 Axar Patel Shivam Mavi Sri Lanka Captain Shanaka
Hardik Pandya IND vs SL : सामन्यापूर्वीच पांड्याने केली एक मोठी चूक; लंकेच्या कर्णधाराने उचलला फायदा

श्रीलंकेने ठेवलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था पहिल्या 5 षटकातच 4 बाद 34 धावा अशी झाली. कुसल रजिताने इशान किशन (2), शुभमन गिल (5) यांना बाद करत दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या राहुल त्रिपाठीला दिलशान मधुशनकाने 5 धावांवर बाद करत भारताची अवस्था 3 बाद 21 धावा अशी केली.

त्यानंतर आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने चमिरा करूणारत्नेच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत चांगली सुरूवात केली. मात्र मचिराने त्यानंतर पांड्याला 12 धावांवर बाद करत भारताला पाचव्या षटकात चौथा धक्का दिला. दीपक हुड्डा देखील 12 चेंडूत 9 धावांची भर घालून परतला. भारताचा निम्मा संघ 57 धावात गारद झाला.

भारताचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर आलेल्या अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत सघाला शतक पार पोहचवले. या दोघांनी सामना 36 चेंडूत 83 धावा असा आणला.

 Axar Patel Shivam Mavi Sri Lanka Captain Shanaka
Arshdeep Singh : N, N4, N6, अर्शदीप सिंगचे षटक संपेना... हार्दिक जाम वैतागला

मात्र सूर्यकुमार यादव 36 चेंडूत 51 धावा करून बाद झाला अन् 40 चेंडूत 91 धावांची भागीदारी रचणारी जोडी फुटली. आता सामना 24 चेंडूत 58 धावा असा आला. त्यानंतर 18 व्या षटकात शिवम मावीने 17 धावा केल्या. त्यानंतर 19 व्या षटकात 12 धावा करत सामना एक षटक आणि 21 धावा असा आणला.

श्रीलंकेचा कर्णधार शानकाने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी घेतली. त्याने 31 चेंडूत 65 धावा करणाऱ्या अक्षरला तिसऱ्या चेंडूवर बाद केले अन् सामना भारताच्या हातून गेला. अखेर लंकेने सामना 16 धावांनी जिंकत मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी केली.

तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावा ठोकत भारतासमोर 207 धावांचे आव्हान ठेवले. श्रीलंकेने शेवटच्या 5 षटकात तब्बल 77 धावा चोपल्या. भारताकडून उमरान मलिकने 3 आणि अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या. मात्र अर्शदीपने दोन षटकात 5 नो बॉल टाकले. तर शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 नो बॉल टाकला. इथेच भारताने नो बॉल अन् फ्रि हिटवर 22 पेक्षा जास्त धावा दिल्या.

हेही वाचा : ...तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()